मराठी बातम्या /बातम्या /देश /

राहुल गांधी म्हणाले, नवं मत्स्य मंत्रालय स्थापन करा, भाजपसह नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

राहुल गांधी म्हणाले, नवं मत्स्य मंत्रालय स्थापन करा, भाजपसह नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

काँग्रेस पक्षाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांचे ट्वीटर अकाऊंट तांत्रिक कामासाठी तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांचे ट्वीटर अकाऊंट तांत्रिक कामासाठी तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात एक मोठीच चूक केली. मत्स्यपालन मंत्र्यांनीच राहुल यांना उत्तर दिलं आणि त्यातून सोशल मीडियावर राहुल गांधी पुन्हा एकदा ट्रोल झाले.

    नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : पुदुच्चेरीच्या (झuducherry) आपल्या दौऱ्यात सोलाइ नगर इथल्या सभेत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी मच्छिमारांच्या (Fishermen) एका सभेला संबोधित केलं. यादरम्यान राहुल गांधीनं त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक स्वतंत्र मंत्रालय (separate new ministry) स्थापन केलं जावं असं वक्तव्य केलं. या चुकीच्या वक्तव्यामुळं भाजप (BJP) आणि सोशल मीडिया युजर्सनी (Social media users) राहुल यांना लक्ष्य केलं (Targeted Rahul Gandhi) आहे. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलन आणि मच्छीमारांचा उल्लेख करत म्हटलं, 'सरकारनं देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याविरुद्ध (farmers) तीन कायदे (new farm laws) संमत केले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मी इथं मच्छिमारांच्या सभेत शेतकऱ्यांबाबत का बोलतो आहे. पण मी तुम्हा सगळ्यांना सागरी शेतकरी मानतो.' राहुल असंही म्हणाले, की पुढच्या वेळी इथं आल्यावर मला तुम्हा मच्छीमारांसोबत नावेत बसून प्रवास करायचा आहे. त्यातून मला तुमच्या अडचणी आणि दु:खं कळतील. राहुल गांधी म्हणाले, की जमिनीवर शेती करणाऱ्यांसाठी दिल्लीत कृषी मंत्रालय (ministry of agriculture)असू शकतं तर सागरी शेतकऱ्यांसाठी असं कुठलं मंत्रालय असू शकत नाही? हेही वाचाशेतकरी आंदोनाचा झटका! पंजाबमध्ये नगरपालिका निवडणुकांत भाजपला मोठा झटका यावर केंद्रीय मस्त्यपालन मंत्री गिरीराज सिंह (Union minister of animal husbandry, dairying and fisheries) यांनी ट्विट केलं, की 'राहुल जी! तुम्हाला इतकं तरी माहीत असायलाच हवं, की 31 मे 2019 रोजीच मोदीजींनी नवीन मंत्रालय स्थापन केलं आहे. शिवाय 20050 कोटी रुपयांची महायोजना (PMMSY) सुरू केली. ही योजना स्वातंत्र्यापासून 2014 सालापर्यंत केंद्र सरकारनं केलेल्या खर्चापेक्षा (3682 कोटी) कितीतरी पट जास्त आहे.' मत्स्य पालन मंत्रालय सांभाळणाऱ्या गिरीराज सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिलं, 'राहुल जी! माझी तुम्हाला विनंती आहे, की तुम्ही नव्या मत्स्यपालन मंत्रालयात या किंवा मी तुम्ही बोलवाल तिथं येईल आणि पुदुच्चेरीसोबत संपूर्ण देशभरात नव्या मस्त्य मंत्रालयाद्वारे कार्यान्वित असलेल्या योजनांबाबत माहिती देतो.' सोबतच राहुल यांनी इटालियन भाषेतही (Italian) एक ट्विट केलं. स्मृती इराणी (Smriti Irani) यांनीही राहुल गांधींवर इटालियन भाषेत हल्ला चढवला आहे. अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनीही एक ट्विट करत टोमणा मारला आहे. गिरीराज सिंह आणि मत्स्य मंत्रालयाला टॅग करत राहुल यांनी लिहिलं आहे, 'राहुल गांधीजी हे मंत्रालय आणि हे मंत्री आहेत. आणि एकदा पुन्हा खोट्या राजकारणाच्या नादात काँग्रेस तोंडघशी पडते आहे.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BJP, Rahul Gandhi (Politician), Smriti irani

    पुढील बातम्या