• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • बोर्डाची बेजबाबदार वागणूक; परीक्षांवरुन प्रियंका गांधी यांची तीव्र प्रतिक्रिया

बोर्डाची बेजबाबदार वागणूक; परीक्षांवरुन प्रियंका गांधी यांची तीव्र प्रतिक्रिया

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सीबीएसई बोर्डाच्या वर्तनावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, बोर्डाचा हा व्यवहार बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 9 एप्रिल : देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट गंभीर स्वरुपात वाढते आहे. याच पार्श्वभूमीवर सीबीएसई (CBSE) च्या आगामी परीक्षांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सीबीएसई बोर्डाच्या वर्तनावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, बोर्डाचा हा व्यवहार बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे. 'विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास भाग पाडणं ही मंडळाची बेजबाबदार वागणूक आहे. बोर्डाची परीक्षा अशा प्रकारे कॅन्सल किंवा रिशेड्यूल केली जाऊ शकते, की मुलं पुन्हा ऑनलाईन परीक्षा देऊ शकतील आणि त्यांना गर्दीतही जावं लागणार नाही.' असं ट्विट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीबीएसई परीक्षा 4 मे ते 11 जूनपर्यंत घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. लाईव्ह सुरू असलेल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमादरम्यान, सोशल मीडियावर विद्यार्थी पंतप्रधान मोदींना बोर्ड परीक्षा आणि महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा स्थगित केली जावी, असं सांगत होते. पंतप्रधान मोदींच्या ट्विटरवर लाईव्ह सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या व्हिडीओ खाली परीक्षा रद्द करण्याची मागणी होत होती.

  (वाचा - MPSC परीक्षा पुढे ढकलल्यानंतरही सरकारचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती)

  बुधवारी संपूर्ण दिवस ट्विटरवर बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसंबंधीत हॅशटॅग ट्रेंड होत होता. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनाही टॅग केलं होतं. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे परीक्षा आयोजित केल्या जात नसल्याचंही विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता परीक्षाबद्दल काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: