काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड गुजरात निवडणुकीनंतरच

काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड गुजरात निवडणुकीनंतरच

10 जनपथवर ही बैठक झाली. याच बैठकीत काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीद्वारे अध्यक्षपदाच्या निवडीच्या तारखांवर निश्चिती झाली.

  • Share this:

20 नोव्हेंबर: काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड आता गुजरात निवडणुकीनंतरच होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतात की नाही याचं उत्तर गुजरातच्या निवडणुकीनंतर ही कळेल.

राहुल गांधींना कांग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चालू आहे.  त्यासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणी समितीची आज बैठक बोलवली होती. 10 जनपथवर ही बैठक  झाली. याच बैठकीत काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीद्वारे अध्यक्षपदाच्या निवडीच्या तारखांवर निश्चिती झाली.

काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने होत असते. गुजरात निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी जोरदार प्रचार केला आहे. गुजरातच्या निवडणुकीचे निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे.या निवडणुकीच्या निकालांकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकींचे निकाल लागल्यानंतरच आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी निवडले जातात की नाही हे कळेल.सोनिया गांधी काँग्रेसच्या सध्या अध्यक्ष आहेत.

 

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक

  • 1 डिसेंबर- काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज मिळण्यास सुरूवात
  • 4 डिसेंबर-अर्ज भरण्याची अंतिम तारीख
  • 5 डिसेंबर- अर्जांची चाचपणी
  • 11 डिसेंबर- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
  • 16 डिसेंबर-काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मतदान
  • 19 डिसेंबर-मतमोजणी आणि निकाल

First published: November 19, 2017, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading