शेतकऱ्यांसोबत काँग्रेस, वाढदिवस साजरा न करण्याचा सोनिया गांधींचा निर्णय

शेतकऱ्यांसोबत काँग्रेस, वाढदिवस साजरा न करण्याचा सोनिया गांधींचा निर्णय

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा आजचा 13वा दिवस असून आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला काँग्रेससह 20 हून अधिक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आपल्या जन्मदिवसाबाबत काही घोषणा केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : कृषी कायद्याविरोधात (Farm Laws) शेतकरी आंदोलन (Farmer Protest) सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा आजचा 13वा दिवस असून आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला काँग्रेससह 20 हून अधिक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आपल्या जन्मदिवसाबाबत काही घोषणा केल्या आहेत. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन आणि कोरोना व्हायरसच्या स्थितीमुळे 9 डिसेंबर रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचं सांगितलं आहे.

देशातील अनेक भागात, विशेषत: दिल्लीतील सीमांवर शेतकरी मागील13 दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. सरकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठीच आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.

(वाचा - Coronavirus: आता कोणत्याही आजारावरील वॅक्सीन बनवण्यासाठी कमी वेळ लागेल?)

9 डिसेंबर रोजी सोनिया गांधी यांचा जन्मदिवस आहे. बुधवारी त्या 74 वर्षांच्या होतील. मात्र त्यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगितलं आहे. त्याशिवाय 9 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सहाव्यांदा चर्चा होणार आहे. यापूर्वी पाच वेळा झालेल्या चर्चेतून कोणताही निष्कर्ष आलेला नाही. त्यामुळे आता उद्या 9 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 8, 2020, 10:30 AM IST

ताज्या बातम्या