नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. पण सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे सोनिया गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाऊ शकल्या नाहीत. त्यानंतर ईडीकडून त्यांना 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली. वाचा : राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेनेने घेतला मोठा निर्णय सोनियांनी ईडीकडे मागितला होता वेळ यापूर्वी ईडीने सोनिया गांधी यांना 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. पण कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. नॅशनल हेराल्ड प्रकरणातच ईडीने राहुल गांधी यांनाही समन्स बजावले आहे. ईडीने राहुल गांधी यांना 13 जून रोजी चौकशीसाठी हजर राण्यास सांगितले आहे. उद्या काँग्रेसचा देशभरात मोर्चा राहुल गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने समन्स बजावले असताना काँग्रेस पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत 13 मार्च रोजीच्या आंदोलनासंदर्भात चर्चा झाली. काँग्रेसकडून 13 जून रोजी देशभरातील ईडी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच दिल्लीतील ईडी कार्यालयावरही मोर्चा काढण्यात येणार आहे.Congress interim president Sonia Gandhi admitted to Ganga Ram Hospital today owing to Covid-related issues. She is stable and will be kept at the hospital for observation, says Congress leader Randeep Singh Surjewala pic.twitter.com/AkDP5ncMg8
— ANI (@ANI) June 12, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Delhi, Sonia gandhi