'मी राजीनाम्यावर ठाम!' राहुल गांधींची मनधरणी करण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश

राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, यासाठी पक्षातून त्यांची मनधरणी केली जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 06:04 PM IST

'मी राजीनाम्यावर ठाम!' राहुल गांधींची मनधरणी करण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश

नवी दिल्ली, 1 जुलै : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला. या निवडणुकीचा निकाल लागून जवळपास एक महिना उलटून गेला, तरीही काँग्रेसमध्ये अजूनही विचार मंथन, एकमेकांचे रुसवे-फुगवे दूर करण्याचाच सिलसिला सुरू आहे. यादरम्यानच एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत तर दुसरीकडे त्यांच्या मनधरणीसाठी अन्य राज्यांतील नेत्यांकडूनही आपापले राजीनामे सोपवले जात आहेत.  राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, यासाठी पक्षातून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी (1 जुलै)पुन्हा एकदा राहुल गांधींची मनधरणी करण्यात आली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राहुल गांधींना राजीनामा न देण्यासाठी ट्विटरवरून विनंती केली. पण त्यांचं म्हणणं  मान्य करण्यास राहुल यांनी स्पष्ट नकार दिला.

(वाचा :बीफ बॅन खटला : या महिला न्यायाधीश नाही करणार सुनावणी)

'काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा आता मागे घेतला जाणार नाही. यासंदर्भात यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे', असं स्पष्टीकरण राहुल गांधींनी दिलं आहे.

(वाचा :महिलांचं गर्भाशय काढून टाकण्याचं प्रकरण, दक्षता समित्यांची स्थापना करणार)

राहुल गांधींनी विनंती फेटाळली

गहलोत यांनी ट्विटरवर पोस्ट केले की,'आताच्या परिस्थितीत राहुल गांधी पक्ष चालवू शकतात, यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांची वचनबद्धता आपला देश आणि देशवासीयांसोबत आहे'.

पण, आपण राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगत राहुल गांधींनी गहलोत यांची विनंती स्पष्टपणे फेटाळली.

2017मध्ये राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान

राहुल गांधी यांनी 2017 मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती. लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी 25 मे रोजी काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण सदस्यांनी त्यांचा प्रस्ताव एकमतानं फेटाळला होता.

VIRAL FACT: सरकारने वारकऱ्यांना साडेपाच लाख रेनकोट वाटले का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 05:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...