News18 Lokmat

राहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक?

अखिलेश यादव आणि मायावती यांनी अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या दोन पारंपरिक मतदार संघात उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2019 08:25 PM IST

राहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक?

नवी दिल्ली 21 जानेवारी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीशीवाय महाराष्ट्रातूनही लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये वाराणशी आणि बडोदा अशा दोन मतदारसंघातून निवडणुक लढवली होती. त्याच प्रमाणं राहुल गांधीही राज्यातल्या नांदेड या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढू शकतात असं वृत्त एका वृत्त वाहिनीने दिलं आहे.


नांदेड हा काँग्रेसचा गढ मानला जातो. 2014 च्या मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी ही जागा जिंकली होती. त्यामुळे ही सर्वात सुरक्षीत जागा समजली जाते. निवडणुकीत कुठलाही धोका राहु नये यासाठी अनेक दिग्गज नेते दोन जागांवरुन निवडणूक लढतात. त्याचा फायदा इतर मतदार संघावरही होत असतो.


2014 च्या निवडणुकीत भाजपने अमेठीतून स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी राहुल गांधींना तगडं आव्हान दिलं होतं. आता राज्यातही भाजपचं सरकार आहे. त्यामुळे काँग्रेस कुठलाही धोका पत्करायला तयार नाही. त्यातच उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने आघाडी केल्याने काँग्रेसलाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...


मात्र अखिलेश यादव आणि मायावती यांनी अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या दोन पारंपरिक मतदार संघात उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 08:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...