23 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष आज त्यांच्या पक्षातर्फे संविधान बचाव अभियानाचं उद्घाटन करणार आहेत. नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअममध्ये त्यांचं भाषण होईल. या कार्यक्रमाला डॉ. मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर दलित समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून हे अभियान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. दलितांवर होणारे हल्ले आणि घटनेवरही होणारे तथाकथित हल्ले, याविरोधात हे देशव्यापी अभियान आहे. यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
The past three years have witnessed an unprecedented rise in atrocities against Dalits. Despite this, the SC/ST Act has been diluted. The Modi Govt is a clear and present danger to the Constitution of India. It is time for us to unite and #SaveTheConstitution pic.twitter.com/zKGMgihmHa
— Congress (@INCIndia) April 22, 2018
काँग्रेसचा हेतू काय ?
- काँग्रेस पक्ष मुस्लिम, दलितांचा कैवारी असं दाखवण्याचा प्रयत्न
- भाजप दलितविरोधी, असा काँग्रेसचा आरोप
- अॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या कोर्टाच्या निर्णयावरही चर्चा
- राज्याराज्यात काँग्रेसकडून कार्यक्रमांचं आयोजन
- कर्नाटकची निवडणूक जवळ आली आहे
- 2019ची लोकसभा निवडणूक फक्त एक वर्षावर
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा