मोदींच्या आदेशाने मल्ल्या देशाबाहेर पळाला का? राहुल गांधींचा जेटलींना सवाल

मोदींच्या आदेशाने मल्ल्या देशाबाहेर पळाला का? राहुल गांधींचा जेटलींना सवाल

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर थेट हल्ला चढवलाय.

  • Share this:

 नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : कर्जबुडव्या विजय मल्ल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन देश सोडल्याचा दावा केल्यानंतर एकच खळबळ उडालीये. आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर थेट हल्ला चढवलाय. अरुण जेटली यांनी विजय मल्ल्याला पाठीशी घातलंय. जेटलींना माहिती होतं की विजय मल्ल्या देशाबाहेर जाणार होता. आता त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

विजय मल्ल्याने देशबाहेर जाण्यापूर्वी अरुण जेटली यांची भेट घेतली होती. त्यांची ही भेट संसदेत झाली. अरुण जेटली प्रत्येक मुलाखतीला ब्लाॅग लिहीत असतात पण त्यांनी या भेटीबद्दल ब्लाॅग का लिहिला नाही ?, अर्थमंत्री म्हणाले की मल्ल्यासोबत काही शब्द बोललो, मग ते खोटे आहे का ? असा सवालही राहुल गांधींनी उपस्थितीत केला.

देश सोडण्याआधी अरुण जेटलींना भेटलो होतो-विजय मल्ल्या

सरकारमध्ये पंतप्रधान मोदी हे सर्व काही ठरवत असतात. आता अर्थमंत्र्यांनी भारताला सांगावं की, त्यांनी भारतातून कर्जबुडव्या मल्ल्या पळून जाऊ दिलं यासाठी मोदींनी आदेश दिले होते का ? असा गंभीर सवाल राहुल गांधींनी उपस्थितीत केलाय.

तसंच अर्थमंत्री हे कर्जबुडव्या मल्ल्याशी बोलतात. त्याने अर्थमंत्र्यांना सांगितलं की, मी लंडनला जाणार आहे. मग अर्थमंत्र्यांनी अरुण जेटली यांनी सीबीआय, ईडी आणि पोलिसांना याची माहिती का दिली नाही ? असा सवालही राहुल गांधींनी विचारला.

तडजोडीसाठी विजय मल्ल्याची भेट झालीच नाही-अरुण जेटली

या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते पीएल पुनियाही हजर होते. त्यांनी दावा केलाय की, 'संसदेच्या सेंट्रल हाॅलमध्ये मल्ल्या आणि जेटली यांना एकत्र पाहिलं होतं. ही काही छोटी मुलाखत नव्हती 15-20 मिनिटं दोघांमध्ये बैठक झाली होती.'

या भेटीनंतर अडीच वर्ष जेटली शांत राहिले, अडीच वर्ष त्यांनी हे लपवून ठेवलं होतं. संसदेत यावर चर्चाही झाली. पण जेटलींनी याबद्दल कधी खुलासा केला नाही असंही पुनिया म्हणाले.

ज्या दिवशी विजय मल्लया देश सोडून गेला. त्याच्या दोन दिवसांआधी संसदेच्या केंद्रीय कक्षात अरुण जेटली आणि मल्ल्यांना चर्चा करताना पाहिलं होतं असा दावा पुनिया यांनी केला होता.

काय म्हणाला विजय मल्ल्या ?

काल बुधवारी लंडन येथील वेस्टमिंस्टर कोर्टाबाहेर विजय मल्लयाने एनआयए या वृत्तसंस्थेशी बोलताना धक्कादायक खुलासा केलाय. देश सोडून जात असताना आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलो होतो. त्यांना कर्जफेडीसाठी एक प्रस्तावही दिला होता असा दावाच त्याने केलाय. त्याच्या या दाव्यामुळे एकच गोंधळ उडालाय.

अरुण जेटलींनी खुलासा

"तडजोडीच्या प्रस्तावासंदर्भात माझी भेट घेतल्याचं वक्तव्य लंडनमध्ये असलेल्या विजय मल्ल्यानं प्रसारमाध्यमांना दिलं. हे वक्तव्य धादांत खोटं आणि बिनबुडाचं आहे. 2014 पासून मी त्याला भेटण्यासाठी कधीही अपॉईंटमेंट दिलेली नाही, त्यामुळे त्याला भेटण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही. विजय मल्ल्या राज्यसभेचा सदस्य होता.

एके दिवशी मी माझ्या कक्षाकडे जात असताना मल्ल्या पळत आला आणि त्यानं माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी तडजोडीचा प्रस्ताव सादर करत असल्याचं त्यानं सांगितलं. याआधीच्या मल्ल्याच्या निष्फळ आणि बिनकामाच्या प्रस्तावाचा अनुभव असल्यानं मी त्याच्याशी संवाद साधण्याचं आवर्जून टाळलं. आपण संवाद साधण्यात काहीच अर्थ नसून तुम्हाला जी काही ऑफर द्यायची आहे ती बँकेला द्या असं मी मल्ल्याला निक्षून सांगितलं."-अरुण जेटली

=================================================

VIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी

First published: September 13, 2018, 3:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading