नवी दिल्ली, 02 जुलै : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधी यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना राजीनाम्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण, राहुल गांधी अद्याप देखील आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यांना राजीनाम्यापासून रोखण्याचे अनेक प्रयत्न काँग्रेसकडून झाले. दरम्यान, राहुल गांधी यांचा ठाम निर्धार पाहून काँग्रेसनं नव्या अध्यक्षपदाचा शोध देखील सुरू केला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशिलकुमार शिंदे यांचं नाव देखील आघाडीवर असून अध्यक्षपदाच्या रेसमधून अशोक गेहलोत यांचं नाव मागे पडलं आहे. पण, राहुल गांधी यांचा राजीनामा अद्याप देखील स्वीकारला गेलेला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचा राजीनामा का स्वीकारला गेला नाही अशी चर्चा रंगली आहे. तर, प्रियांका गांधी देखील परदेशात असल्यानं राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर अद्याप देखील विचार झालेला नाही.
राहुल गांधींसाठी या काँग्रेस कार्यकर्त्याने केला आत्महत्येचा प्रयत्नका नाही स्वीकारला गेला राजीनामा?
राहुल गांधींऐवजी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? यावर आता विचारमंथन सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचं नाव निश्चित होत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही. सर्व प्रथम अशोक गेहलोत यांचं नाव समोर आलं होतं. पण, सोनिया गांधींनी मात्र त्याला नकार दिला. राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यामधील गटबाजीमुळे देखील सोनिया गांधी नाराज होत्या.
बँकांना चुना; CBIची देशातल्या 18 शहरांमध्ये छापेमारीताक देखील फुंकून पिणार
काँग्रेसला असा अध्यक्ष हवा जो गांधी घराण्याच्या मर्जीतील असेल. शिवाय, सीताराम केसरी प्रकरणानंतर काँग्रेसनं ताक देखील फुकून पिण्याचं ठरवलं आहे. जातीचं राजकारण पाहता दलित वर्ग आतापर्यंत काँग्रेसच्या मागे राहिला आहे. त्यामुळे सुशिलकुमार शिंदे यांना अध्यक्षपदी नेमल्यास काँग्रेसला जातीचं राजकारण देखील साधता येणार आहे. तर, सुशिलकुमार शिंदे हे गांधी घराण्याच्या विश्वासातील देखील आहेत.
VIDEO: युवकानं डुक्कर चोरला, जमावानं बेदम धुतलं
Published by:ram deshpande
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.