काँग्रेसचा पुढील अध्यक्ष गांधी परिवारातला नको-राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्षपदासाठी माझ्याऐवजी प्रियंका गांधींचं नाव सुचवू नका - राहुल गांधी

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 05:37 PM IST

काँग्रेसचा पुढील अध्यक्ष गांधी परिवारातला नको-राहुल गांधी

नवी दिल्ली, 25 मे : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. यानंतर शनिवारी (25 मे) झालेल्या CWCच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्ती केली होती. पण बैठकीत राहुल यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळण्यात आला, अशी माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुरजेवाला यांनी सांगितले की, 'काँग्रेसनं पक्षानं पराभव स्वीकारला आहे. पण पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधीच कायम राहतील. पक्षांतर्गत बदल करण्याचे पूर्ण अधिकारी राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत'.

अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधीचंही नाव सुचवू नका - राहुल गांधी

दरम्यान, 'काँग्रेसचा पुढील अध्यक्ष गांधी परिवारातला असू नये. तसंच प्रियंका गांधींच्या नावाचाही प्रस्ताव अध्यक्षपदासाठी ठेवला जाऊ नये', असेही राहुल गांधींनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

पाहा :VIDEO : काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींची घराण्याबाबत मोठी मागणी, पाहा UNCUT पत्रकार परिषदजवळपास तीन तास काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरू होती. बैठकीदरम्यानच राहुल गांधींनी सांगितलं की, 'मी अध्यक्षाच्या स्वरूपात काम करू इच्छित नाही, पण मला पक्षासाठी काम करायचं आहे'. यानंतर बैठकीतून राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा बाहेर पडले. बैठकीत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांनीही आपापलं म्हणणं मांडलं. राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ नये, असं एकमत सदस्यांनी व्यक्त केलं. सदस्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर राहुल गांधींनी बैठकीला संबोधित केलं.पाहा :संतापजनक! कथित गोरक्षकांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा VIDEO व्हायरल

यापूर्वी 23 मे रोजीदेखील राहुल यांनी सोनिया गांधींकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर सोनियांनी त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीसमोर आपलं म्हणणं मांडण्याचा सल्ला दिला. शनिवारीदेखील(25 मे) राहुल गांधी आपला राजीनामा देऊ इच्छित होते, पण बैठकीपूर्वी प्रियंका गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राहुल गांधींना समजावलं. 'निवडणुकीत जय-पराजय होत असतो, यासाठी राजीनामा देण्याची गरज नाही', अशा शब्दांत मनमोहन सिंग यांनी राहुल गांधींची समजूत काढली.


पाहा : VIDEO : लोकसभेत महाराष्ट्राची महिला शक्ती, काय म्हणाल्या नवनिर्वाचित खासदार?पराभवावर विचारमंथन

लोकसभा लोकसभा निवडणूक  2019मध्ये मोदी त्सुनामीमध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला. पराभवावर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग देखील हजर होते.

लोकसभा निवडणुकीत का झाला काँग्रेसचा पराभव?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ अमेठी इथं पराभव झाला. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला शून्यावर बाद व्हावं लागलं. या मानहानिकारक पराभवानंतर काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे. 'आमच्या पक्षाने केलेला नकारात्मक प्रचार हे आमच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण ठरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल घोटाळ्याचा आरोप करत आम्ही आक्रमक भूमिका घेतली. 'चौकीदार चोर है', या मागच्या घोषणेला चांगला प्रतिसादही मिळाला. पण तिच घोषणा आमच्यासाठी नुकसान करणारी ठरली,' असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे. याबाबत 'इंडियन एक्स्प्रेस'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, पराभवाची जबाबदारी घेत पक्ष पातळीवर अनेक नेते राजीनामे देत असून राहुल गांधी यांच्या कार्यालयामध्ये काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्यांचा पाऊस पडला आहे. लोकसभा निवडणूक 2014मधील पराभवानंतर काँग्रेस सावरेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी आपल्या स्वभावात बदल करत आक्रमक रूप धारण केलं होतं. त्यामुळे काँग्रेस भाजपला कडवी झुंझ देईल, असं चित्र निर्माण झालं होतं.

'राफेलच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा' आणि 'चौकीदार चोर है' ही घोषणा गाजल्याने त्याचा फटका भाजपला बसेल असंही बोललं जात होतं. मात्र या कुठल्याही मुद्याचा परिणाम झाला नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. महाराष्ट्रात तर अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे नेते पराभूत झाले. त्यामुळे विविध पदांवर असलेल्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे राजीनामे पाठवायला सुरुवात केली आहे.

SPECIAL REPORT : मृत्यूच्या दारातून लहानग्यांना खेचून आणणाऱ्या 'हिरो'ने सांगितली थरारक कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...