जिनं जन्मानंतर राहुल गांधींना सर्वप्रथम हातात उचललं होतं; तिची झाली खास इच्छापूर्ती

जिनं जन्मानंतर राहुल गांधींना सर्वप्रथम हातात उचललं होतं; तिची झाली खास इच्छापूर्ती

Rahul Gandhi : राहुल गांधी वायनाड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजम्मा या नर्सची भेट घेतली.

  • Share this:

वायनाड, 09 जून : अमेठीतून राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. पण, वायनाडमधून मात्र राहुल गांधी विजयी झाले. त्यानंतर राहुल गांधी आता वायनाड दौऱ्यावर असून त्यांनी रोड शो करत वायनाडच्या जनतेचे आभार देखील मानले. रविवार हा राहुल गांधी यांच्या वायनाड दौऱ्याचा शेवटचा दिवस. यावेळी त्यांनी राजम्मा वावथिल यांची भेट घेतली. राजम्मा वावथिल या राहुल गांधी यांच्या जन्मावेळी हॉस्पिटलमध्ये हजर होत्या. राहुल गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राजम्मा यांनी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावर सवाल करण्यात आले. त्यावेळी देखील राजम्मा यांनी सारी परिस्थिती कथन केली होती. त्यांनी राहुल गांधी भारतीयच असल्याचं म्हटलं होतं.

AIR STRIKE नंतर पाकिस्तानी महिलेनं मानले मोदींचे आभार; काय आहे तिचं भारतीय कनेक्शन

राजम्मा यांना आजही आठवतो तो दिवस

राजम्मा वावथिल यांना सोनिया गांधी यांना रूग्णालयात दाखल केल्याचा दिवस आजही आठवतो. ज्या दिवशी राहुल गांधी यांचा जन्म झाला त्या दिवशी राजम्मा रूग्णालयात होत्या. सोनिया गांधींना रूग्णालयात दाखल केल्यानंतर राजीव गांधी आणि संजय गांधी बाहेर वाट पाहत होते. राजम्मा ही गोष्ट सर्वांना सांगतात. राजम्मा यांचं वय 72 वर्षे आहे. जन्मानंतर राहुल गांधी यांना उचलून घेणाऱ्या राजम्मा या पहिल्या नर्स आहेत. इंदिरा गांधींच्या नातूला पाहून मला खूप आनंद झाला होता असं राजम्मा सांगतात. राहुल गांधी यांच्या जन्मावेळी राजम्मा नर्सिंगचं ट्रेनिंग घेत होत्या.

आता रेल्वेच्या या मार्गांवर मिळणार ‘मसाज’ सर्विस

सुब्रह्मण्यम स्वामींना दिलं होतं उत्तर

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर सवाल केले होते. त्यावेळी त्यांनी स्वामींचे आरोप आधारहीन असल्याचं राजम्मा यांनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या जन्माशी संबंधित सर्व रेकॉर्ड रूग्णालयात असल्याचं देखील राजम्मा यांनी म्हटलं होतं.

जंगली हत्तींची धुमाकूळ; टस्कर हत्तीकडून फळबागांची नासधूस

First Published: Jun 9, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading