मोदींच्या गुजरातमधून राहुल-प्रियांका फुंकणार प्रचाराचं रणशिंग

मोदींच्या गुजरातमधून राहुल-प्रियांका फुंकणार प्रचाराचं रणशिंग

लोकसभेचं बिगूल वाजलं असून आता काँग्रेसनं थेट मोदींचा आव्हान दिलं आहे. राहुल गांधी अहमदाबादमध्ये काय बोलतात? याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 12 मार्च : निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर काँग्रेसनं आता प्रचाराला सुरूवात केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज गुजरातमध्ये रॅली काढणार असून यावेळी प्रियांका गांधी देखील हजर असणार आहेत. त्यामुळे अहमदाबाद येथील राहुल गांधींच्या भाषणाकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला असून आता थेट गुजरातमधून मोदींना काँग्रेस आव्हान उभं करणार आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा निकाल हा 23 मे रोजी लागणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता देखील लागू झाली आहे. दरम्यान, भाजपनं देखील प्रचारासाठी कंबर कसली आहे.


'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका सोडणार का? काय म्हणाले अमोल कोल्हे


2014 प्रमाणे भाजपला यश मिळणार?

Loading...

2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गुजरातमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. यावेळी 26 जागांवर भाजपनं विजय मिळवला होता. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कामगिरीकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.


Loksabha Election LIVE : मोदींच्या गुजरातमधून राहुल-प्रियांका फुंकणार प्रचाराचं रणशिंग


हार्दिक पटेलका 'हात' काँग्रसके 'साथ'

पाटीदार समजाचा नेता हार्दिक पटेल देखील आता काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अहमदाबाद येथे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेलच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे. जामनगरमधून हार्दिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपवर नाराज असलेला पाटीदार समाज लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाला साथ देणार हे देखील पाहावं लागणार आहे.


लोकसभा निवडणुकांमुळे सीएच्या परीक्षा पुढे ढकलल्या, या आहेत नव्या तारखा


एनडीएला बहुमत

2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला बहुमत मिळणार असल्याचं सर्व्हेतून स्पष्ट झालं. पण, 2014च्या तुलनेत मात्र एनडीएला मिळणाऱ्या जागांमध्ये कमी असल्याचं सर्व्हेतून दिसून आलं आहे.


SPECIAL REPORT : गेल्या 27 वर्षांपासून काय आहे शरद पवार आणि विखे पाटलांमध्ये राजकीय संघर्ष?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 08:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...