S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

मोदीजी, आता प्रचार संपला, पार्ट टाईम जॉब असलेल्या PM पदाकडे लक्ष द्या - राहुल गांधी

'विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार आता संपलाय. तेव्हा तुमचा पार्ट टईम जॉब असलेल्या पंतप्रधानपदाकडे लक्ष द्या'

Updated On: Dec 6, 2018 04:50 PM IST

मोदीजी, आता प्रचार संपला, पार्ट टाईम जॉब असलेल्या PM पदाकडे लक्ष द्या - राहुल गांधी

नवी दिल्ली, 5, डिसेंबर : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलंय. विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार आता संपलाय. तेव्हा तुमचा पार्ट टईम जॉब असलेल्या पंतप्रधानपदाकडे लक्ष द्या आणि किमान एक तरी पत्रकार परिषद घ्या असा उपरोधीक सल्ला राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींना दिलाय.


राजस्थान आणि तेलंगणातल्या विधानसभेचा प्रचार बुधवारी संपला. त्यानंतर राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. याचा संदर्भ देत राहुल गांधींनी मोदींवर टीका केलीय. तुम्हाला पंतप्रधान पदावर येऊन आता 1,654 दिवस झालेत. कृपया आता पंतप्रधान पदावर लक्ष द्या असं राहुल गांधी म्हणाले. तर राहुल गांधींच्या या टीकेला भाजपनेही उत्तर दिलंय, राहुल गांधी यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं भाजपने म्हटलं आहे. 
राहुल गांधी म्हणाले, तसा तो तुमचा पार्ट टाईम जॉब आहे असा टोलाही त्यांनी हाणला. सरकारला पाच वर्ष पूर्ण होत असताना तुम्ही एकही पत्रकार परिषद घेतली नाही. तुमच्यासाठी हैदराबादच्या पत्रकार परिषदेचे हे फोटो पाहा आणि कधीतरी एक दिवस असं करा, प्रश्नांना उत्तर देण्याचा आनंद घ्या असा टोलाही त्यांनी मोदींना लगावलाय.


गेल्या चाडेचार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळं त्यांच्यावर सातत्याने टीका होतेय. बुधवारीच झालेल्या प्रचारसभेत मोदींनी ऑगस्टा वेस्टलँडच्या मुद्यावरून राहुल गांधी आणि सोनियांवर थेट हल्लाबोल केला होता.

VIDEO : माधुरीला लोकसभेची उमेदवारी मिळणार या चर्चेनं अनेकांची वाढली 'धकधक'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2018 11:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close