पंतप्रधान मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा, राहुल गांधी यांचं खोचक ट्विट

पंतप्रधान मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा, राहुल गांधी यांचं खोचक ट्विट

आज World Theatre Day म्हणजेच जागतिक रंगभूमी दिन आहे. पंतप्रधान ड्रामेबाजी करतात असा संदेश राहुल गांधी यांना या ट्विटमधून द्यायचा होता असं मत व्यक्त होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या ट्विटरवर जास्तच सक्रिय आहेत. 'मिशन शक्ती' यशस्वी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी DRDO चं अभिनंदन केलं. तुमच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खोचकपणे शुभेच्छाही दिल्या.

पंतप्रधान मोदी हे जाहीरातबाजी करण्यात कायम पुढे असतात असा आरोप काँग्रेसकडून वारंवार करण्यात येत असतो. भाजप ही इव्हेंट कंपनी आहे अशीही टीका होत असते. प्रत्येक गोष्ट भाजप आणि पंतप्रधान अशा अतिशय भडक पद्धतीने सादर करतात अशी टीकाही राहुल गांधी यांनी अनेकदा केला होता.

तोच रोख ठेवत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर ही खोचक टीका केलीय. आज World Theatre Day म्हणजेच जागतिक रंगभूमी दिन आहे. पंतप्रधान ड्रामेबाजी करतात असा संदेश राहुल गांधी यांना या ट्विटमधून द्यायचा होता असं मत राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केलंय.

राहुल गांधी यांच्या या ट्विटची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा होतेय. काँग्रेस समर्थकांनी यावरून पंतप्रधानांना टार्गेट केलं आहे. तर भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसला धारेवर धरलं आहे.

मिशन शक्ती

अमेरिका, रशिया, चीननंतर अंतराळातील महाशक्ती ठरलेला भारत चौथा देश ठरला आहे. लो अर्थ ऑरबीटला भारताने पाडलं. फक्त तीन मिनिटांत ही कामगिरी पुर्ण करण्यात आली.

-मिशन शक्तीच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत A सॅटने ही कामगिरी केली.

- याबद्दल पंतप्रधान मोदींनी या मोहिमेशी संबंधित सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केलं.

भारताने सर्वच क्षेत्रात प्रगती करताना आता अंतराळातही महाशक्ती झाला आहे.

-भारतीयांसाठी हा गौऱवाचा दिवस असून देशाला एक मोठी ताकद दिली आहे.

- देशाची संरक्षणातील ताकद वाढली आहे.

First published: March 27, 2019, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading