मोदींनी ‘राफेल’वर माझ्यासोबत 15 मिनिटं चर्चा करून दाखवावी : राहुल गांधी

मोदींनी ‘राफेल’वर माझ्यासोबत 15 मिनिटं चर्चा करून दाखवावी : राहुल गांधी

‘पंतप्रधान मोदींनी कुठेही, कोणत्याही जागी, कोणत्याही राज्यात व्यासपीठावर येऊन माझ्यासोबत 'राफेल'बाबत चर्चा करून दाखवावी’

  • Share this:

रायपूर, 18 नोव्हेंबर : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारावर माझ्यासोबत 15 मिनिटं चर्चा करून दाखवावी,’ असं आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. छत्तीसगडमध्ये पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी हे आव्हान दिलंय. पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांत राहुल गांधी 'राफेल'वरून मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत.

‘मी पंतप्रधान मोदींना चॅलेंज करतो, त्यांनी कुठेही, कोणत्याही जागी, कोणत्याही राज्यात व्यासपीठावर येऊन माझ्यासोबत राफेलबाबत चर्चा करून दाखवावी,’ असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर राफेल करारावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय आहे राफेल वाद?

राफेलच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. राफेल करारात मोदींनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. तसंच या मुद्द्यावरून राहुल यांनी राफेल विमान बनवणाऱ्या ‘दसॉ’ या कंपनीवरही आरोप केले होते.

राहुल गांधींच्या आरोपाला ‘दसॉ’ या कंपनीच्या सीईओ यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी खोटं बोलत नाही. मी कंपनीचा सीईओ सारख्या जबाबदार पदावर आहे. त्यामुळे मी खोटं बोलण्याचा संबंधच येत नाही,’ असं म्हणत ‘दसॉ’चे सीईओ एरिक ट्रॅपिअर यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले होते.

दरम्यान, राफेल प्रकरण सुप्रीम कोर्टातही पोहोचले आहे. राफेल विमानांच्या खरेदीच्या निर्णयाची चौकशी करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टनं राखून ठेवलाय. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या काही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. त्या याचिकांवर कोर्टात सुनावणी सुरू असून चौकशी बाबतचा निर्णय कोर्टानं राखून ठेवला आहे.

First published: November 18, 2018, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading