न्या. लोया मृत्यू प्रकरणात राहुल गांधींनी भाजप आणि अमित शहांची माफी मागावी, भाजप नेत्यांची मागणी

'न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेसची पोल खोल झाली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी या प्रकरणी भाजप आणि अमित शहा यांची माफी मागावी अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2018 11:02 AM IST

न्या. लोया मृत्यू प्रकरणात राहुल गांधींनी भाजप आणि अमित शहांची माफी मागावी, भाजप नेत्यांची मागणी

19 एप्रिल : 'न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेसची पोल खोल झाली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी या प्रकरणी भाजप आणि अमित शहा यांची माफी मागावी,' अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी असं म्हटलं आहे.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणी विशेष सीबीआय तपासणी करावी अशी याचिका केली होती. या प्रकरणात अमित शहा यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. पण ती याचिका सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे.

याच मुद्द्यावरून आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते लखनौच्या प्रसार माध्यमांशी बोलत होते. 'आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो. पण राहुल गांधींनी या प्रकरणी सरकारला बदनाम करण्याचं काम केले आणि अमित शहा यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का लावण्याचा प्रयत्न केला. याबद्दल त्यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी.' असं आदित्यनाथ म्हणाले आहेत.

आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासमारंभाला जात असताना न्यायाधीश लोया यांचा नागपूर येथे हृदयविकाराने मृत्यू झाला. न्यायाधीश लोया हे सीबीआयचे विशेष न्यायाधीश होते. सोहराबुद्दीन खटल्याप्रकरणी ते विशेष न्यायाधीश म्हणून काम करत होते. त्यांच्या मृत्यूवर २०१७मध्ये त्यांच्या बहिणीने शंका व्यक्त केली. बहिणीच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं.

हे प्रकरण मीडियामध्ये आल्यावर काँग्रेसच्या तेहसिन पूनावाला, पत्रकार बीएस लोने, बॉम्बे लॉअर असोसिएशन यांनी या मृत्यूप्रकरणी विशेष सीबीआय चौकशीची मागिणी केली होती. पण त्यांच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2018 02:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...