मराठी बातम्या /बातम्या /देश /काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणार? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणार? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

राहुल गांधी सध्या काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार नसून सोनिया गांधींकडून अनियमित काळासाठी अध्यक्षपदाची अपेक्षा करणं योग्य नाही

राहुल गांधी सध्या काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार नसून सोनिया गांधींकडून अनियमित काळासाठी अध्यक्षपदाची अपेक्षा करणं योग्य नाही

राहुल गांधी सध्या काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार नसून सोनिया गांधींकडून अनियमित काळासाठी अध्यक्षपदाची अपेक्षा करणं योग्य नाही

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : काँग्रेस (Congress) च्या अंतरिम अध्यक्षच्या रुपात सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापही राहुल गांधी यांनी पुढील काळात काँग्रेसचं नेतृत्व सांभाळण्यास तयार नसल्याने काँग्रेस नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

यादरम्यान पार्टीचे वरिष्ठ नेता शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी जनतेमध्ये काँग्रेस दिशाहीन आणि लक्ष्यहीन होत असलेली धारणा संपविण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्षाची (Congress New President) मागणी केली आहे.  थरूर पुढे असंही म्हणाले की त्यांना नक्कीच असं वाटतंय की पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याजवळ ‘साहस, क्षमता आणि योग्यता' आहे, मात्र तरीही ते अध्यक्ष होऊ इच्छित नाहीत तर पार्टीला नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेची मदत घ्यावी लागेल.

केरलमधील तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी News18 सोबत बोलताना हे वक्तव्य केलं. ते म्हणाले, माझी निश्चितच अशी इच्छा आहे की नेतृत्व पुढे चालविण्याबाबत स्पष्टता असायला हवी. मी गेल्या वर्षी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षच्या रुपात सोनिया गांधी यांच्या नियुक्तीचं स्वागत केलं होते. मात्र मला वाटतं की त्यांनी अनिश्चितकाळासाठी ही जबाबदारी घेण्याची अपेक्षा करणं योग्य ठरणार नाही. याबाबत पार्टीकडून निवडणूक घेण्यात येईल का? असा प्रश्न विचारला असता पुढे थरूर म्हणाले की जर राहुल गांधी यांना अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायची नसेल तर निवडणूक घेणं हा पर्याय उपलब्ध राहतो. मात्र यापुढेही पक्षाला काय योग्य वाटतं, यानुसारच पुढील प्रक्रिया ठरविण्यात येईल.

First published:
top videos

    Tags: Rahul gandhi, Shashi tharoor, Sonia gandhi