मराठी बातम्या /बातम्या /देश /Central Vista ला कडाडून विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या राज्यात उभारले जातायत आमदारांसाठी आलिशान फ्लॅट्स

Central Vista ला कडाडून विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या राज्यात उभारले जातायत आमदारांसाठी आलिशान फ्लॅट्स

260 कोटींच्या प्रकल्पात आमदारांसाठी 160 प्रशस्त, आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहेत. कोरोना काळातच (Covid-19 Pandemic) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

260 कोटींच्या प्रकल्पात आमदारांसाठी 160 प्रशस्त, आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहेत. कोरोना काळातच (Covid-19 Pandemic) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

260 कोटींच्या प्रकल्पात आमदारांसाठी 160 प्रशस्त, आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहेत. कोरोना काळातच (Covid-19 Pandemic) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

    जयपूर, 4 जून: मोदी सरकार रेटून नेत असलेल्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला (Central Vista Project)काँग्रेस कडाडून विरोध करत आहे. पण याच कोरोना काळात काँग्रेसच्या (Congress government) राज्यात मात्र आमदारांसाठी लक्झरी फ्लॅट बांधायचा प्रकल्प जोरदार सुरू आहे.

    राजस्थानच्या विधानसभेच्या (Rajasthan Assembly) जवळच एक नवा मोठा प्रकल्प आकाराला येत आहे. राज्य सरकार आमदारांसाठी मोठे, आलिशान फ्लॅट विधानसभा भवनाच्या अगदी जवळ उभे करत आहे. अशा 160 लल्झरी फ्लॅट्सचं काम ज्योती नगर परिसरात सुरू असल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे.

    Covid-19 ची दुसरी लाट सुरू झालेली असताना 20 मे 2021 रोजी या फ्लॅट्सच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. राजस्थान हौसिंग बोर्ड (RHB)या प्रकल्पाचं काम करत आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागी लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता सीएम ममता बॅनर्जी

    266 कोटींचा हा प्रकल्प असून राजस्थान विधानसभेच्या अगदी समोरच हा आमदारांचा गृहप्रकल्प आकाराला येत आहे.

    आमदारांना मिळणार आलिशान आणि प्रशस्त फ्लॅट

    जयपूर विकास मंडळाने (Jaipur Development Authority) 176 फ्लॅटचं प्रपोजल जिलं होतं पण राजस्थान हौसिंग बोर्डाने 160 फ्लॅटच्या बांधकामाला परवानगी दिली असल्याचं हौसिंग बोर्डाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

    याबाबत विचारलं असता, राजस्थान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदसिंह दोतरसा म्हणाले, "हा प्रकल्प कायदेशीर आहे. कायद्याच्या चौकटीतच सगळं काम सुरू आहे."

    गेल्याच महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टच्या कामाला विरोध करताना कोविड साथकाळात हे असले प्रकल्प सुरू ठेवणं म्हणजे अपव्ययाचा गुन्हा (Criminal Wastage) आहे. Central Vista प्रकल्पाअंतर्गत दिल्लीत नव्या सचिवालयाचं (Central Secretariat)काम सुरू आहे. तसंच या पुनर्विकास प्रकल्पात संसद भवनसुद्धा नव्याने बांधण्यात येणार आहे. मोदी सरकारने कोरोना काळातही या प्रकल्पाचं काम थांबवलेलं नाही.

    First published:
    top videos

      Tags: Congress, Delhi, Rajasthan