काँग्रेसचं आॅपरेशन 'हात', भाजपचेच 10 आमदार संपर्कात ?

काँग्रेसचं आॅपरेशन 'हात', भाजपचेच 10 आमदार संपर्कात ?

डियुरप्पा यांच्या निर्णयामुळे भाजपचे आमदार नाराज असल्याची सूत्रांनी माहिती दिलीये.

  • Share this:

कर्नाटक, 18 मे : कर्नाटकात सत्ता स्थापनेचा हायहोल्टेज ड्रामा सुरू आहे. आता काँग्रेसने भाजपच्या गडावर हल्लाबोल करत 10 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिलीये. काँग्रेसने आमदार फोडाफोडीसाठी आॅपरेशन 'हात' सुरू केलंय.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला पण बहुमताने हुलकावणी दिली. तरीही भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेचा दावा केली आणि राज्यपालांनीही भाजपला आमंत्रण देऊन बी.एस. येडियुरप्पांचा शपथविधीही पार पाडला. पण काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन येडियुरप्पांचा डाव हाणून पाडला. आता उद्या संध्याकाळी 4 वाजता येडियुरप्पांना बहुमत चाचणी पास करावी लागणार आहे.

काँग्रेस आणि जेडीएसने आपले आमदार फुटू नये म्हणून हैदराबादला हलवले. आमदार फुटू नये म्हणून सर्व खबरदारी घेतली जात आहे. आता काँग्रेसने आक्रमक होत आॅपरेशन 'हात' सुरू केलंय. भाजपचे १० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केलाय. भाजपला जशास तसं उत्तर देण्याची काँग्रेसने रणनिती आखली आहे.

बोपय्या निवडीवरुन भाजपमध्ये नाराजी

दरम्यान,  राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलीये. बोपय्या यांच्या निवडीवरून भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले आहे.  येडियुरप्पा यांच्या निर्णयामुळे भाजपचे आमदार नाराज असल्याची सूत्रांनी माहिती दिलीये.

First published: May 18, 2018, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading