Home /News /national /

मोठी बातमी, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊतांची गाडी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवली

मोठी बातमी, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊतांची गाडी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवली

बसगाव येथे दलित सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली झाली. त्याच्या कुटुंबीयांना भेटायला नितीन राऊत उत्तरप्रदेश येथे गेले आहेत

    आजमगड, 20 ऑगस्ट : राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. ताफा अडवल्यामुळे नितीन राऊत यांनी जागेवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना आजमगड सीमा भागात उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरले आहे. नितीन राऊत यांना आजमगडमध्ये येण्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी अटकाव केला आहे. आजमगड येथे सीमेवर पोलिसांनी त्यांना अडवलं आहे. तिथेच रस्त्यावर राऊत यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राऊत यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून आहे. बसगावला जाऊ द्यावे, अशी मागणी काँग्रेस समर्थकांनी केली आहे. बसगाव येथे दलित सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली झाली. त्याच्या कुटुंबीयांना भेटायला नितीन राऊत उत्तरप्रदेश येथे गेले आहेत. नितीन राऊत यांचा ताफा अडवल्यामुळे युपी पोलीस आणि राज्य सरकार असा वाद पेटण्याची चिन्ह आहे. काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशातील आझमगडमधील बांसगावमध्ये एका मागास समुदायातील सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या सरपंचाची हत्या ही उच्च जातीतील व्यक्तींनी केली आहे. ४२ वर्षीय सत्यमेव जयते असं या बांसगावच्या सरपंच नाव आहे.  जयते यांनी ठाकूर समाजातील व्यक्ती वाकून नमस्कार केला नाही, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या