या कारणांमुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांना आहे पसंती

या कारणांमुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांना आहे पसंती

Congress New President : अशोक गेहलोत यांना पसंती देण्यामागे अनेक कारणं आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून : लोकसभेतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचा पुढील अध्यक्ष हा गांधी परिवारातील नसणार हे विशेष ! राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे अध्यक्षपदाची कमान सोपावली जाणार आहे. मोठ्या काळानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गांधी परिवाराबाहेरील व्यक्ती असणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टर अमरिंदर सिंग यांचं नाव देखील यासाठी चर्चेत होतं. पण, आता अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसकडून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. अशोक गेहलोत यांच्यावर विश्वास का? असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे. त्याला कारणं देखील तशीच आहेत.

वर्षभराची कामगिरी

मागील वर्षभरापासून अशोक गेहलोत यांची कामगिरी ही उत्तम राहिली आहे. राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपचा पराभव केला आणि सत्ता मिळवली. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं नसलं तरी भाजपला मात्र जोरदार टक्कर दिली.

घराणेशाहीला रामराम ! गांधी कुटुंबाबाहेरील 'हा' नेता होणार नवा काँग्रेस अध्यक्ष?

40 वर्षापेक्षा जास्त राजकीय अनुभव

अशोक गेहलोत यांनी 3 वेळा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. 2018मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना 40 वर्षापेक्षा जास्त राजकीय अनुभव आहे. त्यांनी अनेक चढ – उतार पाहिले त्याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये झाला.

मद्यधुंद महिलेचे भररस्त्यात तमाशा, VIDEO व्हायरल

स्वच्छ प्रतिमा

स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून देखील गेहलोत यांच्याकडे पाहिलं जातं. वादापासून ते कायम दूर राहिले आहेत. एखादा मोठा निर्णय घेण्यापासून ते लांब राहत नाहीत. 2012मध्ये आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप लागला. त्यानंतर आसाराम बापूला अटक करण्यात आली. शिवाय, 2003मध्ये विहिंप नेते प्रविण तोगडिया यांना देखील जेलमध्ये टाकताना त्यांनी इतर गोष्टींचा विचार केला नाही.

राहुल गांधी आणि काँग्रेसचा विश्वास

काँग्रेस नेतृत्वाच्या विश्वासातील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी केंद्रात मंत्रिपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर नरसिंह राव सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं आहे. शिवाय, राहुल गांधी यांच्याविश्वासातील म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं.

VIDEO: भररस्त्यात बैलांच्या झुंजीचा थरार; नागरिक हैराण

First published: June 20, 2019, 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading