घराणेशाहीला रामराम ! गांधी कुटुंबाबाहेरील 'हा' नेता होणार नवा काँग्रेस अध्यक्ष?

घराणेशाहीला रामराम ! गांधी कुटुंबाबाहेरील 'हा' नेता होणार नवा काँग्रेस अध्यक्ष?

Congress New President : गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेसला आता नवा अध्यक्ष मिळणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. पण, वरिष्ठ नेत्यांनी मात्र राहुल गांधी यांना राजीनाम्यापासून रोखलं. त्यानंतर देखील राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी महिनाभराचा अवधी देत नवा अध्यक्ष निवडण्यास पक्षाला सांगितले. दरम्यान, काँग्रेसला आता गांधी परिवाराव्यतिरिक्त नवा अध्यक्ष मिळणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. अशोक गेहलोत यांच्या मदतीकरता कार्यकारी अध्यक्ष म्हणून कुणाची निवड होणार का? याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काँग्रेस नव्या अध्यक्षाची घोषणा लवकरच करेल असं ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं म्हटलं आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा गांधी घराबाहेरील असावा अशी अट देखील राहुल गांधी यांनी ठेवली होती.

टिफीन धुतला नाही म्हणून पायलटने कर्मचाऱ्याला मारलं, विमानाला दोन तास उशीर

घराणेशाहीच्या आरोपाला मिळणार पूर्णविराम

काँग्रेसवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप झाला आहे. विरोधकांनी देखील काँग्रेसवर याच मुद्यावरून निशाणा साधला आहे. गांधी घराबाहेरील व्यक्तीची निवड अध्यक्षपदी झाल्यास या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.

अमरिंदर सिंग यांचं नाव देखील होतं चर्चेत

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव देखील काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनं पंजाबच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता.

राहुल गांधींच्या फिटनेसचं हे आहे 'सिक्रेट', 49व्या वर्षीही तंदुरुस्त

काय करणार राहुल गांधी?

अशोक गेहलोत यांच्याकडे हे पद एक ते दीड वर्षासाठी असणार आहे. याकाळात राहुल गांधी देशभर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिवाय, सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका करताना त्यांना घराणेशाहीच्या आरोपाचा देखील सामना करावा लागणार नाही.

खुशखबर! येत्या 48 तासांत राज्यात मान्सून दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

First published: June 20, 2019, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading