काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी? काय आहेत काँग्रेस समोरील पर्याय

Congress New President : प्रियांका गांधी यांची निवड अध्यक्षपदी होणार का? 2024साठी प्रियांका गांधी पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार का?

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 12:13 PM IST

काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी? काय आहेत काँग्रेस समोरील पर्याय

नवी दिल्ली, राशिद किडवई, 29 जून : राहुल गांधी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरती ठाम आहेत. काँग्रेस नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर देखील राहुल गांधी एक पाऊल मागे येण्यास तयार नाही. राहुल गांधी यांनी एक महिन्यांची दिलेली मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी बाकी आहे. राहुल गांधी आपला विचार बदलतील असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होतं. पण, ती संधी आता नाही. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी देशभर लोकांशी संवाद साधणार आहेत. शिवाय, लोकसभेत झालेल्या पराभव केवळ राहुल गांधींसाठी नाही तर काँग्रेससाठी देखील विचार करण्यासारखा आहे. देशात घराणेशाही असणाऱ्या राजकीय पक्षांनी देखील या जनादेशाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे.

मुंबईत न्यायालयाच्या आदेशावरून खुन्यावर 20 वर्षं उपचार; नंतर सुनावली जन्मठेपेची

काय आहे काँग्रेससमोरील पहिला पर्याय?

काँग्रेससमोर सध्या तीन पर्याय आहे. त्यापैकी एक म्हणजे राहुल गांधी काँग्रेसचा सुप्रीम लीडर म्हणून काम करू शकतात. काही काळ अध्यक्षपदापासून लांब राहिल्यानंतर राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपदी येऊ शकतात.

दुसरा पर्याय

Loading...

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कार्यकारी अध्यक्षाची निवड करण्यात यावी. त्यानंतर राहुल गांधी देखील पक्षाच्या कामामध्ये लक्ष घालतील. सध्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत आहे. शिवाय, सचिन पायलट यांच्या नावाची देखील चर्चा आहे. पण, सध्यस्थिती पाहता कोण अध्यक्ष होणार ही गोष्ट गुलदस्त्यात आहे. पण, अशोक गेहलोत यांचं नाव आघाडीवर आहे.

काश्मिरात दहशतवाद्यांमध्ये फूट; एकमेकांच्या उठले जीवावर

प्रियांका गांधी अध्यक्षपदी?

अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधींच्या नावाचा पर्याय हा काँग्रेससमोर शेवटचा पर्याय असेल. 2024च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसला काम करणं गरजेचं आहे. शिवाय, प्रियांका गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यास काँग्रेसला उभारी मिळू शकते.

11वी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 12:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...