काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे, गेहलोत यांच्या नावाला या नेत्याचा विरोध?

काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे, गेहलोत यांच्या नावाला या नेत्याचा विरोध?

काँग्रेस अध्यक्षपदी तरूण नेतृत्वाची निवड करावी अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली आहे.

  • Share this:

चंदीगढ, 06 जुलै : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसनं नव्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता सुशीलकुमार शिंदे आणि अशोक गेहलोत यांचं नाव देखील चर्चेत आहे. पण, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी तरूण नेतृत्वाची निवड करावी असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग यांचा सुशीलकुमार शिंदे, अशोक गेहलोत यांच्या नावांना विरोध आहे का? असा सवाल विचारला जात आहे. अद्याप काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी कोणत्याही व्यक्तीची निवड काँग्रेसनं केलेली नाही. पुढील आठवड्यात काँग्रेसची त्याबाबत बैठक होणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

आचार्य प्रमोद कृष्णम यांचं ट्वीट

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता काँग्रेसनं कमजोर अध्यक्ष न देता खंबीर अध्यक्ष द्यावा. त्यामुळे भाजप, RSSशी लढण्याची हिंमत मिळेल असं ट्वीट केलं होतं. आचार्य प्रमोद कृष्णम हे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे लखनऊमधील उमेदवार होते. त्यासाठी काँग्रेसनं बैठकीचं आयोजन करावं, असं देखील त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटल्यानं मोठा वाद झाला होता.

‘प्रियंका गांधींना अध्यक्ष करा’

प्रियंका गांधी या काँग्रेस अध्यक्षपदासाठी सक्षम आहेत. त्या गांधी परिवारातून देखील आहेत. त्यामुळे त्यांना अध्यक्ष करा अशी मागणी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली होती.

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

First Published: Jul 6, 2019 02:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading