आधी पुरुष, मग स्त्री, आता आहेत काँग्रेसच्या सरचिटणीस

आधी पुरुष, मग स्त्री, आता आहेत काँग्रेसच्या सरचिटणीस

आज एवढ्या मोठ्या पदावर असल्यामुळे अप्सरा रेड्डींना आता सगळ्यांकडून मान मिळतोय. पण एक काळ होता, समाज त्यांचा तिरस्कार करायचा.

  • Share this:

मुंबई, 10 जानेवारी : काँग्रेसनं अप्सरा रेड्डी यांना काँग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्त केलंय. तृतीयपंथीय व्यक्तीला सरचिटणीस बनवणारा काँग्रेस हा पहिला पक्ष आहे. आज एवढ्या मोठ्या पदावर असल्यामुळे अप्सरा रेड्डींना आता सगळ्यांकडून मान मिळतोय. पण एक काळ होता, समाज त्यांचा तिरस्कार करायचा. जाणून घेऊया अप्सरा रेड्डी कशा प्रकारे पुरुषाची स्त्री बनल्या.

आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये जन्मलेल्या अप्सरा रेड्डी यांचं पहिलं नाव होतं अजय रेड्डी. अप्सरा रेड्डी यांनी थायलंडच्या हाॅस्पिटलमध्ये आपलं लिंग परिवर्तन केलं. डाॅक्टर सोमभून थामरुन्गरांगनी त्यांचं आॅपरेशन केलं. अप्सरा यांना पहिले तीन महिने देखरेखीखाली ठेवलं गेलं. त्या 8 महिने बँकाॅकमध्ये राहात होत्या आणि त्यानंतर अप्सरा यांचं आॅपरेशन झालं.


अप्सरा यांचं आॅपरेशन 8 तासांपेक्षा जास्त वेळ चाललं. त्यानंतर दोन तास त्यांना देखरेखीखाली ठेवलं. त्या शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांना खूप वेदना होत होत्या. तरीही त्या खूश होत्या. अप्सराच्या या निर्णयाला त्यांच्या आईनं पाठिंबा दिला, पण वडील खूप नाराज होते. आॅपरेशननंतर 4 दिवस अप्सरा हाॅस्पिटलमध्ये होत्या. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. हार्मोन थेरेपीलाही सामोरं जावं लागलं. त्या काळात त्यांना मनात आत्महत्येचे विचार यायचे.

लिंग बदलाच्या आधी अप्सरा यांना अनेक संकटांशी सामना करावा लागला. शाळा-काॅलेजपासून आॅफिसपर्यंत खूप भेदभाव सहन करावा लागला. अप्सरा एक पत्रकारही होत्या. त्यांनी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, मायकल शूमाकर, निकोलस केज अशा मोठ्या हस्तींच्या मुलाखती घेतल्या.

अप्सरा यांनी तामिळ शोंचं सूत्रसंचालन केलंय. त्या 2016मध्ये जयललितांचा पक्ष AIADMKमध्ये गेल्या. त्यानंतर त्या भाजपमध्येही होत्या. आता मात्र त्या काँँग्रेसमध्ये आहेत. पक्षानं त्यांना मोठी जबाबदारी सोपवलीय.


VIDEO : घर खरेदी करणाऱ्यांना मोदी सरकार देणार गिफ्ट, पुढच्या महिन्यात घोषणेची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 12:44 PM IST

ताज्या बातम्या