S M L

काँग्रेसचे 3 खासदार चढले संसदेच्या छतावर; सरकारविरूद्ध केली घोषणाबाजी

कावेरी , मोसूलमधली भारतीयांची हत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न या आणि अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभेत गदारोळ घातला.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 3, 2018 09:59 PM IST

काँग्रेसचे 3 खासदार चढले संसदेच्या छतावर; सरकारविरूद्ध केली घोषणाबाजी

03 एप्रिल: इराकमध्ये मृत्यू पावलेल्या   भारतीयांच्या कुटुंबियांना  मदत मिळावी म्हणून आज काँग्रेसच्या  तीन खासदारांनी आज चक्क  संसदेच्या छतावर चढून आंदोलन केलं . हे तिन्ही खासदार पंजाबचे असून अनेक मुद्दयांवर सरकार विरूद्ध घोषणाबाजी करत होते.

कावेरी , मोसूलमधली  भारतीयांची हत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न या आणि अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभेत गदारोळ घातला. या  गदारोळमुळे लोकसभा बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आली.  मात्र याच  गदारोळानंतर हे  तीन खासदार चक्क संसदेच्या छतावर चढले.   तिथे चढून त्यांनी  घोषणाबाजी सुरु ठेवली.

इराकमध्ये  मोसूल शहरात  भारताचे ३९ नागरिक  आयसीसने ठार मारले. यातले बहुसंख्य पंजाबचे होते.  त्यामुळेच काँग्रेसच्या पंजाबातील  तीन खासदारांनी हा असा पवित्रा घेतला . त्यांनी थेट संसदेच्या छतावर जाऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली

<

 त्यानंतर   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाखांची मदतही जाहीर केली.  भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेच्या छतावर चढून नेत्यांनी आंदोलन केलं असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 09:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close