मराठी बातम्या /बातम्या /देश /'पूर्ण टर्म निलंबित केलं तरी..' खासदार रजनीताई पाटील निलंबनानंतर आक्रमक; काय आहे प्रकरण?

'पूर्ण टर्म निलंबित केलं तरी..' खासदार रजनीताई पाटील निलंबनानंतर आक्रमक; काय आहे प्रकरण?

खासदार रजनीताई पाटील निलंबनानंतर आक्रमक

खासदार रजनीताई पाटील निलंबनानंतर आक्रमक

Congress MP Rajni Patil : काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. राज्यसभा सचिवालयानं याबाबत निर्णय घेतला असून त्यामुळं आता उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. त्यामुळं आता राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन करण्यात आल्यामुळं काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. यानंतर रजनीताई पाटील यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलत असताना हिंडेनबर्ग प्रकरणावरुन विरोधक मोदींविरोधात घोषणाबाजी करत होते. यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारांचा गोंधळ काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील आपल्या मोबाईलमध्ये शूट करत त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं. खासदार पाटील हे व्हिडिओ शूट करत असल्याचं समजताच राज्यसभेचे सभागृह नेते पियूष गोयल यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राज्यसभा सचिवालयानं खासदार रजनीताई पाटील यांना अधिवेशन काळापुरतं निलंबित केलं आहे.

अधिवेशनासाठी काय पूर्ण टर्म निलंबित करा : रजनीताई पाटील

दरम्यान, या कारवाईनंतर खासदार रजनीताई पाटील यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. "स्वातंत्र्यसैनिकांच्या घरातून मी येते आहे. मला या अधिवेशनासाठी काय पूर्ण टर्म निलंबित करा. परंतु, ज्या पद्धतीने भाजपने नाव घेऊन सभागृहात अपमान केला आहे तो सहन करणार नाही, असे रजनीताई पाटील यांनी म्हटले आहे.

वाचा - 'केंद्र सरकार म्हणतंय गाईला मिठी मारा, पण लाथ मारली तर..' अजित पवारांचा सवाल, म्हणाले..

राज्यसभेत अर्थसंकल्पादरम्यान सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, काल काही खासदारांनी सभागृहात ज्या प्रकारे व्हिडीओ बनवले ते अत्यंत आक्षेपार्ह होते. अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी. यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर म्हणाले की, हे माझ्या लक्षात आले असून मी ते गांभीर्याने घेतले आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे. दरम्यान, या कारवाईवर काँग्रेसने टीका केलीय.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी 2023 पासून सुरू झाले असून 6 एप्रिल 2023 पर्यंत चालेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी 2023-24, या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर दुसरा भाग 13 मार्चपासून 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 27 बैठका होणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Congress, Parliament session