काँग्रेसच्या खासदारांची बैठक; कोणाच्या गळ्यात पडणार गटनेते पदाची माळ?

कोण होणार काँग्रेसचा गटनेता? आजच्या बैठकीकडे लक्ष.

News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2019 09:26 AM IST

काँग्रेसच्या खासदारांची बैठक; कोणाच्या गळ्यात पडणार गटनेते पदाची माळ?

नवी दिल्ली, 01 जून : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांनी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या गटनेते पदाची निवड केली जाणार आहे. आजच्या बैठकीत कुणाच्या गळ्यात गटनेते पदाची माळ पडणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. काँग्रेसच्या 52 खासदार या बैठकीला हजर राहणार असून राज्यसभा सदस्य देखील यावेळी उपस्थित असणार आहेत. सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक होणार असून पुढील रणनितीवर यावेळी चर्चा होणार आहे. यापूर्वी 25 मे रोजी देखील काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. पण, काँग्रेसच्या वर्किंग कमिटीनं मात्र त्यांचा राजीनामा फेटाळून लावला होता.

राजकीय हालचालींना वेग

पराभवानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला होता. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार का? यावर चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, राष्ट्रवादीनं मात्र सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

शिवाय, सुप्रिया सुळे यांच्याकडे विरोधपक्ष नेतेपद जाणार अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात जोरात रंगली होती. मोदी सरकारच्या 57 मंत्र्यांच्या शपथविधी झाला असून त्याचं खातेवाटप देखील पूर्ण झालं आहे.


Loading...

समाजकंटकांकडून पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 09:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...