पाटना,28 जुलै: एकीकडे जेडीयूचे काही नेते नितीश कुमारांच्या निर्णयाचा विरोध करत असतानाच दुसरीकडे नितीश कुमारांना बिहारमधील काँग्रेसचे काही आमदार नितीश कुमारांना पाठिंबा देण्याची शक्यता असल्यची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
नितीश कुमारांची फ्लोअर टेस्ट आज 11 वाजता बिहार विधानसभेत होणार आहे. नितीश कुमारांना 132 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र त्यांनी राज्यपालांना बुधवारी दिलं होतं. भाजप आणि जेडीयूच्या आमदारांची एकूण संख्या 124च आहे त्यामुळे बाकीचे 8 आमदार कुठल्या पक्षाचे आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच जेडीयूचे आमदारही बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.