नरेंद्र मोदींवर टीका करण्याच्या नादात काँग्रेस आमदार स्वत:च झाले ट्रोल, युजर्सनी सुनावलं

नरेंद्र मोदींवर टीका करण्याच्या नादात काँग्रेस आमदार स्वत:च झाले ट्रोल, युजर्सनी सुनावलं

वापरकर्त्यांनी काँग्रेसच्या आमदाराला विचारपूर्वक बोलण्याचा व लिहिण्याचा सल्ला दिला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जून : ट्विटरवर अनेकदा आपली विधाने आणि वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे चर्चेत असलेले काँग्रेसचे आमदार जीतू पटवारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मंगळवारी त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढीव किमतीबद्दल ट्विट केले होते. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात ते स्वत:च ट्रोल झाले आहेत.

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी जीतू पटवारी यांना विचारपूर्वक लिहावे व बोलण्याचा सल्ला दिला आहे. वापरकर्त्यांनी म्हटले आहे की, जीतू पटवारी यांनी आपल्या ट्विटर पोस्टवर मुलींचा अपमान केला आहे. मंगळवारी काँग्रेसचे माजी मंत्री जीतू पटवारी यांनी ट्वीट केले की 'मुलाच्या प्रेमात 5 मुली जन्माला आली! 1-नोटाबंदी, 2-जीएसटी, 3-महागाई, 4-बेरोजगारी आणि 5-मंदी. परंतु अद्याप ‘विकास’चा जन्म झालेला नाही.

सर्वसामान्यांसह एका पोलीस अधिकाऱ्यानेही जीतू पटवारी यांना सांगितलं आहे. पोलीस अधिकारी प्रणव महाजन यांनी जीतूला रिट्वीटवर केलं आहे, ते म्हणतात -  'जीतू पटवारी जी, सरकारवर टीका करणे हा तुमचा अधिकारी आहे, पण तुमच्या या उदाहरणाने चुकीचा संदेश जातो. या ट्विटवरुन मुली आपल्याला अप्रिय आहेत, असा संदेश जातो. माझी आपणास विनम्र विनंती आहे की हे ट्विट काढून टाका आणि योग्य शब्दावली वापरुन सरकारवर टीका करा.

 

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 24, 2020, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading