कर्नाटकात राजकीय भूकंपाचे संकेत; CM कुमारस्वामींनी दिली धमकी

कर्नाटकात राजकीय भूकंपाचे संकेत; CM कुमारस्वामींनी दिली धमकी

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट निर्माण झाले आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 28 जानेवारी: कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट निर्माण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी थेट राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. कुमारस्वामी यांच्या मते काँग्रेसचे आमदार सीमा ओलांडत आहेत.

राज्यातील काँग्रेस आणि जेडीएस सरकारच्या स्थापनेपासून सुरु असलेले संकट अद्याप कमी झाले नाही. काँग्रेसच्या काही आमदारांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाच आपले मुख्यमंत्री असल्याचे विधान केले होते. काँग्रेस आमदारांच्या या विधानानंतर कुमारस्वामी यांनी राजीनामा देण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले.

काँग्रेस नेत्यांनी यावर विचार करावा. जर त्यांना असे करायचे असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. काँग्रेसचे आमदार सीमा ओलांडत आहेत. यामुळे त्यांचेच नुकसान होणार आहे. काँग्रेस नेत्यांनी पक्षातील आमदारांना नियंत्रणात ठेवले पाहिजे, असेही कुमारस्वामी म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते जी.परमेश्वर यांनी मात्र कुमारस्वामी सर्वात चांगले मुख्यमंत्री आहेत असे विधान केले. काँग्रेसच्या आमदारांचे ते नेते आहेत. आमदारांसाठी कुमारस्वामीच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी केवळ मत मांडले. यात चुकीचे काही नाही. आम्ही (काँग्रेस) मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या कामावर खुश आहोत, असे परमेश्वर यांनी सांगितले.

VIDEO : अब चौकीदार बदलनेका वक्त आ गया है - ओवैसी

First published: January 28, 2019, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading