काँग्रेस आमदाराने पत्नीसोबत बेडरुममध्ये शूट केलेला Tik-Tok VIDEO झाला व्हायरल!

काँग्रेस आमदाराने पत्नीसोबत बेडरुममध्ये शूट केलेला Tik-Tok VIDEO झाला व्हायरल!

आमदाराने आरोप केला आहे की, खासगी असलेला हा व्हिडिओ पत्नीचा मोबाइल हॅक करून व्हायरल करण्यात आला आहे.

  • Share this:

पटना, 02 सप्टेंबर : टिकटॉक व्हिडिओ सध्या चर्चेत येत असतात. एका लहानश्या व्हिडिओमुळं अल्पावधित प्रसिद्धी मिळत असल्यानं मोठ्या प्रमाणावर याचा वापर होत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना या टिकटॉकने वेड लावलं आहे. आता एक काँग्रेस आमदार यामुळं चर्चेत आला आहे. या टिकटॉक व्हिडिओमुळं आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बिहार राज्यातील एका काँग्रेस आमदाराने पत्नीसोबत बेडरूममध्ये टिकटॉक व्हिडिओ तयार केला. यामुळं त्या आमदाराची प्रतिमा खराब होत आहे. तर विरोधकांनी या व्हिडिओवरुन त्यांना घेरलं आहे. दरम्यान पत्नीचा मोबाइल हॅक करून हा व्हिडिओ विरोधकांनीच व्हायरल केला असल्याचा दावा आमदाराने केला आहे. या प्रकरणी जनता दरबारात तक्रारही केली होती असं आमदारानं म्हटलं आहे.

सिकंदरा येथील काँग्रेस आमदार सुधीर कुमार उर्फ बंटी चौधरी आणि त्यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी आमदार सुधीर कुमार यांनी पोलिस अधिक्षकांच्या जनता दरबारात धाव घेतली आहे. त्यांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुधीर कुमार यांनी हा

व्हिडिओ व्हायरल कसा झाला याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सुधीर कुमार यांनी म्हटलं आहे की, त्यांनी पत्नीसोबत व्हिडिओ तयार केला होता. तो खासगी व्हिडिओ होता. मात्र, त्यांच्या पत्नीचा मोबाइल हॅक करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असं त्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल करून प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोपही सुधीर कुमार यांनी केला आहे.

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

Published by: Suraj Yadav
First published: September 2, 2019, 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading