बेंगळुरू, 30 जानेवारी: कर्नाटक विधानसभेतून (Karnataka Legislative Council) एक धक्कादायक प्रकास समोर आला आहे. याठिकाणी काँग्रेसचा एक आमदार एका कॅमेरापर्सनच्या कॅमेऱ्यात मोबाइलवर अश्लिल व्हिडीओ पाहताना कैद झाले आहेत. प्रकाश राठोड (Prakash Rathod) असं त्यांचं नाव असून, त्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी असं कारण सांगितलं आहे की, ते त्यांच्या फोनमधील ‘Unwanted Clips’ डिलीट करत होते. पण स्थानिक मीडियाने त्यांचा हा व्हिडीओ चॅनेल्सवर देखील दाखवला आहे. त्यामुळे प्रकाश राठोड यांना सोशल मीडियावर देखील ट्रोल केलं जात आहे.
त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘आम्ही शक्यतो सभागृहामध्ये फोन घेऊन जात नाही, पण मला एक प्रश्न विचारायचा होता आणि त्याकरता मी आतमध्ये फोन घेऊन गेलो होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की, माझ्या मोबाइलमधील स्टोअरेज फुल्ल आहे म्हणून मी त्यातील गरजेच्या नसणाऱ्या क्लिप्स डिलिट करण्यास सुरुवात केली.’ CNN-News18 शी बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
(हे वाचा-राम मंदिरासाठी निधी गोळा करणाऱ्या तिघांवर हल्ला, 40-50 अज्ञातांविरोधात FIR दाखल)
कर्नाटक विधानपरिषदेमध्ये हा प्रकार काही पहिल्यांदा घडत नाही आहे. विधानपरिषदेमध्ये 2012 साली भाजपचे लक्ष्मण सावडी हे देखील मंत्री सीसी पाटील यांच्या समवेत पॉर्न व्हिडीओ पाहताना रंगेहाथ पकडले गेले होते. सावडी आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी देखील त्यांच्यवर करण्यात आलेले आरोप फेटाळले होते. त्यावेळी देखील भाजपला टीका सहन करावी लागली होती. दरम्यान सावडी यांचा मंत्रिमंडळात समावेश करून घेतल्याने येडीयुरप्पा यांना त्यांच्या पक्षातील लोकांनी प्रश्न विचारले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka