मराठी बातम्या /बातम्या /देश /

8 काँग्रेस आमदारांचं क्रॉस व्होटिंग, परब यांचा रिसॉर्ट कोसळणार? गणेशोत्सव काळात पुण्यात दारूबंदी TOP बातम्या

8 काँग्रेस आमदारांचं क्रॉस व्होटिंग, परब यांचा रिसॉर्ट कोसळणार? गणेशोत्सव काळात पुण्यात दारूबंदी TOP बातम्या

Nana Patole Prithviraj Chavan Congress G23

Nana Patole Prithviraj Chavan Congress G23

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 30 ऑगस्ट : महाराष्ट्रात झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये (Maharashtra Vidhan Parishad Election) काँग्रेसच्या 8 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं समोर आलं आहे. शिवसेना मंत्री अनिल परब यांचा वादग्रस्त साई रिसोर्ट जमीनदोस्त करण्यात येणार आहे. ईडीच्या नोटीसीनंतर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पुण्यात गणेशोत्सव काळात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्या काही मिनिटांत वाचा.

6 आमदारांचं भाजपला तर दोघांचं राष्ट्रवादीला क्रॉस व्होटिंग

महाराष्ट्रात झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये (Maharashtra Vidhan Parishad Election) काँग्रेसच्या 8 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे. मोहन प्रकाश (Mohan Prakash) यांच्या एक सदस्यीय समितीने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना (Sonia Gandhi) हा रिपोर्ट दिल्याचं वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

माजी मंत्री अनिल परब यांना मोठा धक्का!

शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) लवकरच पाडणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

पृथ्वीराज चव्हाण सदस्य असलेल्या ग्रुपवर पटोलेंचा खळबळजनक आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी G-23 बद्दल खळबळजनक आरोप केले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) देखील सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या G-23 चे भाग होते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

शरद पवारांचं ते स्वप्न अधूरंच राहणार!

शरद पवारांचं पंतप्रधान (Sharad Pawar) व्हायचं स्वप्न अधूरंच राहणार आहे. खुद्द शरद पवारांनीच पंतप्रधान व्हायच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

शिंदे-फडणवीसांची भेट का घेतली? रोहित पवारांनी सांगितलं कारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) ठाण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत असतानाच दुसरीकडे त्यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मंत्रालयात भेट घेतली, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) तिकडे उपस्थित होते. या नेत्यांमध्ये 10-15 मिनिटं चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत भेटीचं कारण सांगितलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

गणेशोत्सव काळात पुण्यात दारूबंदी

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. गणेशोत्सव काळातील काही दिवस पुण्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवश जिल्ह्यातील दारूची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

आणखी एकाचा भाजपमध्ये प्रवेश? दरेकरांची घेतली भेट

पंढरपूरचे उद्योजक अभिजीत पाटील (Abhijeet Patil) आयकर विभागाने (Income Tax Raid) टाकलेल्या धाडींमुळे अडचणीत सापडले आहेत. पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar BJP) यांनी अभिजीत पाटील यांची भेट घेतली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

ट्विन टॉवरच्या 60 हजार टन ढिगाऱ्यातून जन्मणार अनेक गोष्टी

मात्र, ढिगाऱ्यांबाबत एक गोष्ट अशीही समोर येत आहे की, ट्विन टॉवरच्या (Twin Tower) ढिगाऱ्याचा काही भाग तेथील तळघर भरण्यासाठी वापरला जाऊ शकतो. कारण या ठिकाणी उद्यान विकसित केले जाणार आहे. मात्र, तरीही तळघरात भराव टाकल्यानंतरही सुमारे 40 हजार टन डेब्रिज शिल्लक राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

First published:

Tags: Anil parab, Pune, शरद पवार