भारत- पाकिस्तानच्या सद्य स्थितीवर नवज्योत सिंग सिंधूने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

भारत- पाकिस्तानच्या सद्य स्थितीवर नवज्योत सिंग सिंधूने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, ‘दहशतवादाला पूर्ण संपवून टाकण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे.

  • Share this:

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०१९- पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले नवज्योत सिंग सिद्धू यांनी भारत- पाकिस्तानच्या सद्य स्थितीवर म्हटले की, ‘सध्याची परिस्थिती पाहता मी माझ्या देशाच्या बाजूने उभा आहे. या परिस्थितीत सामान्य नागरिकांकडूनही योग्य सहयोग मिळेल अशी अपेक्षा आहे.’

तर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगे म्हणाले की, ‘आमच्या पक्षाकडूनही भारतीय सैन्याला पूर्ण समर्थन आहे. पण यात मी केलं... मी केलं... असं म्हणून राजकिय स्वार्थ पाहायला नको. इंदिरा गांधी यांनी जेव्हा बांग्लादेशला स्वतंत्र केलं होतं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनीही कौतुक केलं होतं. आम्ही चांगल्या गोष्टीला नेहमीच पाठिंबा देतो.’

ओम प्रकाश राजभर म्हणाले की, ‘भारतीय सेनेचे आम्ही आभारी आहोत. पुलवामा हल्ल्यानंतर देशभराची इच्छा होती की, पाकिस्तानविरुद्ध कारवाई व्हावी.’ तर योग गुरू बाबा रामदेव म्हणाले की, ‘आपल्या वायुसेनेने उत्तर दिलं आणि तिथे ३०० हून जास्त दहशतवादी ठार करत पराक्रम काय असतो ते दाखवून दिलं. आम्हाला सेनेचा अभिमान आहे. पाकिस्तानला आमची सेना अशी शिक्षा घडवेल की पुढची अनेक वर्ष तो तोंड दाखवू शकणार नाही.’

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, ‘दहशतवादाला पूर्ण संपवून टाकण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीर भारतात घेणं हा एकमेव पर्याय समोर आहे आणि  भारतीय सेना हे करू शकते.’

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक व्हिडीयो संदेश देत भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव मांडला. युद्धाने कुठल्याही देशाचं भलं झालं नाही. युद्धाचा शेवट हा विनाशच असतो असं सांगत त्यांनी पाकिस्तानने आज सकाळी केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचं समर्थन केलं.

इम्रान खान यांचा हा व्हिडीयो एडिट करून लावण्यात आला होता. पाकिस्तानला कुठल्या नागरी किंवा लष्करी तळावर हल्ला करायचा नव्हता तर फक्त आपली शक्ती दाखवायची होती असंही ते म्हणाले. भारताचे दोन पायलट आमच्या ताब्यात आहेत असा दावा इम्रान खान यांनी केला. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही पुरावे देण्याची मागणी केली होती. मात्र भारताने पुरावे दिले नाही, उलट पाकिस्तानच्या हद्दीत येवून हल्ले केले.

परिस्थिती अशीच चिघळत राहिली तर माझ्या आणि नरेंद्र मोदी यांच्या हातातही काही राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं. आम्ही सर्व विषयावर चर्चा करण्यास तयार आहोत असं सांगत त्यांनी भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला.

भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, घटनास्थळावरील EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 06:30 PM IST

ताज्या बातम्या