मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! काँग्रेसच्या मिटिंगमध्ये महिला कार्यकर्त्याला बेदम मारहाण, पाहा LIVE VIDEO

धक्कादायक! काँग्रेसच्या मिटिंगमध्ये महिला कार्यकर्त्याला बेदम मारहाण, पाहा LIVE VIDEO

या बैठकीदरम्यान मुकुंदभास्कर मणी यांना तिकीट दिल्या प्रकरणावरून हा वाद झाल्याची माहिती मिळाली आहे.

या बैठकीदरम्यान मुकुंदभास्कर मणी यांना तिकीट दिल्या प्रकरणावरून हा वाद झाल्याची माहिती मिळाली आहे.

या बैठकीदरम्यान मुकुंदभास्कर मणी यांना तिकीट दिल्या प्रकरणावरून हा वाद झाल्याची माहिती मिळाली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

देवरिया, 11 ऑक्टोबर : काँग्रेसच्या बैठकीदरम्यान एका महिलेनं कार्यालयात येऊन गोंधळ केला आणि तिथे वाद सुरू झाला. राष्ट्रीय सचिव सचिन नायक यांच्या समोर हा वाद शिगेला पोहोचला आणि तुफान गोंधळ सुरू झाला. जमलेल्या कार्यकर्त्यांना या महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिला नेत्याला बेदम मारहाण केल्याचा या बैठकीतील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील देवरिया जनपद इथे काँग्रेसच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. या बैठकीला अनेक कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. राष्ट्रीय सचिव सचिन नायकही या बैठकीत होते. त्यांच्यासमोर आलेल्या या महिला नेत्यानं आवाज चढवून बोलायला सुरुवात केली आणि गोंधळ घातला. हा वाद शिगेला पोहोचला आणि हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचा-भाजप सरकारचा मोठा निर्णय, नोव्हेंबरपासून मदरसे चालवणं बंद करणार

या बैठकीदरम्यान मुकुंदभास्कर मणी यांना तिकीट दिल्या प्रकरणावरून हा वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसने चुकीच्या व्यक्तीला तिकीट दिल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. ज्या व्यक्तीला तिकीट दिलं आहे तो बलात्कार प्रकरणात गुन्हेगार असल्याचा गंभीर आरोप देखील या महिलेनं केला आहे. हा विरोध करताना महिलेनं गोंधळ घातल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी या महिलेला बेदम मारहाण केली आहे.

बैठकीदरम्यान झालेल्या गोंधळाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महिलेवर हात उचलणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर काय कारवाई केली जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला की नाही याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

First published:

Tags: Congress, Uttar pradesh, Uttar pradesh news