राहुल गांधी कोकेन घेतात, सुब्रम्हण्यम स्वामींच्या वक्तव्याविरुद्ध गुन्हा दाखल

राहुल गांधी कोकेन घेतात, सुब्रम्हण्यम स्वामींच्या वक्तव्याविरुद्ध गुन्हा दाखल

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध त्यांनी अनेकदा सनसनाटी आरोप केले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 7 जुलै : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे कोकेन घेतात, या वक्तव्यामुळे भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी हे अडचणीत आले आहेत. स्वामी यांच्या विरुद्ध काँग्रेसने उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर छत्तीसगडमध्येही स्वामींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वामी हे आपल्या वक्तव्यांमुळे कायम वाद निर्माण करतात. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध त्यांनी अनेकदा सनसनाटी आरोप केले आहेत.

पंजबाचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना डोपिंग टेस्ट सक्तिची केली होती. त्यावरून देशपातळीवर चर्चा सुरू आहे. त्याच विषयावर बोलताना स्वामी यांनी हे सनसनाटी विधान केलं होतं. राहुल गांधी हे डोपिंग टेस्टसाठी तयार आहेत का? असा सवालही स्वामी यांनी केला होता.

VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या कोतवाली नगर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव पी.एल. पुनिया यांनी दिलीय. स्वामी यांच्याविरुद्ध कडक करवाई करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

प्रियंका गांधींवरही राजीनाम्यासाठी दबाव

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव आणि राहुल गांधी यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा या दोन बाबी काँग्रेससाठी धक्कादायक अशाच म्हणाव्या लागतील. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली. त्यामुळे लोकसभेत देखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विजयची आशा काँग्रेसला होती. पण, देशातील जनतेनं मात्र काँग्रेसला साफ नाकारलं आणि काँग्रेसचा दारूण पराभव झाला. अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासाठी ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती.

नोकरीच्या आमिषानं 50 भारतीयांची एजंटकडून फसवणूक

त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस नेत्यांनी केलेला मनधरणीचा प्रयत्न देखील फोल ठरला. काँग्रेसमध्ये आतापर्यंत 140 नेत्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचा भरणा अधिक आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या जवळचे असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे प्रियंका गांधी देखील राजीनामा देणार का? अशी चर्चा आता दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यासाठी प्रियंका गांधींवर दबाव वाढत असल्याचं देखील बोललं जात आहे.

First published: July 7, 2019, 6:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading