UPAच्या कार्यकाळात 6 सर्जिकल स्ट्राईक; काँग्रेसने जाहीर केली यादी!

UPAच्या कार्यकाळात 6 सर्जिकल स्ट्राईक; काँग्रेसने जाहीर केली यादी!

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईक संदर्भात केलेल्या दाव्यानंतर काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या 6 सर्जिकल स्ट्राईकची यादीच जाहीर केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 मे: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईक संदर्भात केलेल्या दाव्यानंतर काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या 6 सर्जिकल स्ट्राईकची यादीच जाहीर केली आहे. यातील पहिला सर्जिकल स्ट्राईक 19 जानेवारी 2008रोजी, दुसरा 30 ऑगस्ट-1 सप्टेंबर, तिसरा 6 जानेवारी 2013, चौथा 27-28 जुलै 2013, पाचवा 6 ऑगस्ट 2013 आणि सहावा 23 डिसेंबर 2013 रोजी करण्यात आल्याचे म्हटले आहे.

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारतीय लष्कराच्या शौर्याचा वापर मतं मिळवण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करत आहे. बुधवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले की, युपीएच्या कार्यकाळात देखील अनेक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. आम्ही शुत्रूला सडेतोड उत्तर देण्यासाठी त्याचा वापर केला होता. या गोष्टीचा वापर आम्ही कधीच मतं मिळवण्यासाठी केला नसल्याचे ते म्हणाले होते.

याआधी निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक प्रचार सभेत युपीएच्या कार्यकाळात अनेक सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगितले होते. पण माजी पंतप्रधान सिंग यांनी प्रथमच सर्जिकल स्ट्राईक संदर्भात वक्तव्य केले होते.

गडचिरोली हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

First published: May 2, 2019, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading