काँग्रेसची नववी यादी : पी. चिदंबरम यांच्या मुलाला पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी

माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना तामिळनाडूमधील शिवगंगा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 07:35 PM IST

काँग्रेसची नववी यादी : पी. चिदंबरम यांच्या मुलाला पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी

नवी दिल्ली, 24 मार्च: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची नववी यादी जाहीर केली आहे. यात एकूण 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना तामिळनाडूमधील शिवगंगा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर बिहारमधील किशनगंजमधून मोहम्मद जावेद, कटिहारमधून तारिक अनवर तर पूर्णिया मतदारसंघातून उदय सिंह यांना तिकीट देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या आजच्या यादीत जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघातून हाजी फारुक मीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कर्नाटकमधील दक्षिण बेंगळुरु येथून बी.के.हरिप्रसाद यांना तर महाराष्ट्रातील अकोलामधून हिदायत पटेल यांना, रामटेक येथून किशोर गजभिये, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर तर हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.याआधी शनिवारी रात्री काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत 38 उमेदवारांची नावे होती. यात महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघातून अशोक चव्हाण यांचा समावेश होता. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना कर्नाटकातील गुलबर्गामधून तिकीट देण्यात आले आहे.

Loading...

एयरसेल-मॅक्सिस घोटाळ्याप्रकरणी कार्ती चिदंबरम यांची चौकशी सुरु आहे. याआधी 2014च्या लोकसभा निवडणुकीत देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र अण्णा डीएमकेच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता.


तोरंगणा घाटात खासगी बस दरीत कोसळली, घटनास्थळावरचा पहिला VIDEOबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2019 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...