काँग्रेस नेत्यानं इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर झाला ट्रोल

चांद्रयान मोहिमेत अपेक्षित यश मिळालं नसलं तरीही देशभरातून शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अभिमानास्पद कामगिरी केली असल्याच्या भावना देशवासियांनी व्यक्त केल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2019 06:20 PM IST

काँग्रेस नेत्यानं इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर झाला ट्रोल

मुंबई, 07 सप्टेंबर : भारताची महत्त्वकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेत अखेरच्या क्षणी लँडर विक्रमशी संपर्क तुटला. चंद्रापासून अवघ्या 2 किमी अंतरावर लँडरशी संपर्क तुटला. असे असले तरी देशभरातून इस्त्रोच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत: इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना धीर देत पुन्हा नव्यानं सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. दरम्यान, काँग्रेस नेते आणि दिल्लीचे माजी खासदार उदित राज यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेला अखेरच्या क्षणी अडथळा आला आणि लँडर विक्रम चंद्रापासून 2 किलोमीटर अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अपेक्षित असं यश या मोहिमेला मिळालं नसलं तरी ही मोहिम अयशस्वी ठरली असं म्हणता येणार नाही. इस्त्रोच्या सर्व संशोधकांनी केलेली मेहनत वाया गेलेली नाही.

लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या दिल्लीच्या माजी खासदारांनी ट्विट करताना इस्रोवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, आपल्या शास्त्रज्ञांनी नारळ फोडणं आणि पूजा करण्याच्या जागी विज्ञानाची शक्ती आणि आधार घेतला असता तर थोडंसुद्धा अपयश बघायला मिळालं नसतं.

लँडर विक्रमशी संपर्क तुटला असला तरी चांद्रयान मोहिम पुढचे एक वर्ष सुरू राहणार आहे. चांद्रयान 2 चे लँडर आणि रोव्हरशी संपर्क तुटला आहे. पण चंद्राच्या कक्षेत चांद्रयान 2 चे ऑर्बिटर त्याचं काम करत आहे. ऑर्बिटरच्या माध्यमातून फोटो इस्त्रोला मिळत राहतील.

Loading...

शास्त्रज्ञांनी सांगितलं की, लँडरशी संपर्क तुटल्यानं मोहिमेला 5 टक्के इतकाच धक्का बसला आहे. तर 95 टक्के काम सुरू राहणार आहे. 5 टक्क्यांमध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळं चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र ऑर्बिटरच्या सहाय्यानं इतर माहिती मिळत राहणार आहे. चांद्रयान 2 चा ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे.

चंद्रावर उतरण्याच्या भारताच्या कित्येक वर्षांच्या स्वप्नाला अपेक्षित यश आलं नाही. पण इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. 'आपल्या टीमनं प्रचंड मेहनत घेतली आहे. देश तुमच्या पाठीशी आहे,' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी निराश झालेल्या शास्त्रज्ञांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

'तुम्ही भारतमातेसाठी जगणारे लोक आहात. जीवनात चढ-उतार येत असतात. शेवटच्या क्षणी आलेल्या अपयशाने तुमचं यश झाकणार नाही,' असं म्हणत नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.

सॉफ्ट लँडिंगचा शेवटच्या खडतर टप्प्याकडे सर्व जगाचं लक्ष लागलेलं असतानाच विक्रमकडून सिग्नल येणं बंद झालं. त्यामुळे इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी नजरा लावून बसलेल्या भारतीयांची निराशा झाली. मात्र ही मोहीम शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणं हेही एक मोठं यश असल्याचं शास्रज्ञांचं मत आहे.

लाडक्या रॅम्बोला भेटायला पोहोचले राज ठाकरे, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 06:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...