VIDEO: 'गद्दार' म्हटल्याने काँग्रेस नेत्याने LIVE शोमध्ये पाहा काय केले

VIDEO: 'गद्दार' म्हटल्याने काँग्रेस नेत्याने LIVE शोमध्ये पाहा काय केले

एका टिव्ही शोमध्ये भाजप आणि काँग्रेस नेते एकमेकांना भिडले...

  • Share this:

नवी दिल्ली, 07 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ११ तारखेला होणार आहे. देशभरात सुरु असलेल्या प्रचार सभांमधून नेते मंडळी आरोप प्रत्यारोप करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सर्वच राजकीय पक्ष प्रचार करत आहेत. यात माध्यमे देखील मागे नाहीत. टिव्हीवरील चर्चामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते त्यांची बाजू जोमाने मांडत आहेत. पण अशाच एका टिव्ही शोमध्ये भाजप आणि काँग्रेस नेते एकमेकांना भिडले...

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका टिव्ही शोमध्ये चर्चा करत असताना काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि भाजपचे प्रवक्ते के.के.शर्मा यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की शब्दांवरील चर्चा एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत पोहोचली. चर्चेमध्ये भाजपच्या शर्मा यांनी काँग्रेसचे नेते शर्मा यांना वारंवार गद्दार म्हटले. यावर संतप्त झालेल्या अलोक शर्मा यांनी त्यांच्या समोर ठेवलेले पाणी के.के.शर्मा यांच्या अंगावर देखील पडले. यात हे पाणी टिव्हीच्या अँकरवर देखील पडले.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामुळे चर्चा पुढे सुरु करण्यासाठी अँकरला त्याचे कपडे बदलावे लागले. त्यानंतर अँकरच्या सांगण्यावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांची माफी मागितली. अर्थात या घटनेनंतर भाजपने संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत काँग्रेसवर टीका केली.

VIDEO: जयदत्त क्षीरसागर यांच्या भेटीनंतर पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

First published: April 7, 2019, 12:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading