पंतप्रधान मोदी हे शिवलिंगावर बसलेले विंचू -शशी थरूर

बंगळुरूमध्ये आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये थरूर यांनी हे वक्तव्य केलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2018 06:29 PM IST

पंतप्रधान मोदी हे शिवलिंगावर बसलेले विंचू -शशी थरूर

28 आॅक्टोबर : काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले आहे. थरूर यांनी पंतप्रधानांना चक्क विंचवाची उपमा दिली आहे.  संघाच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख न करता थरूर  म्हणाले की, " मोदी हे शिवलिंगावर बसले विंचू सारखे आहे. त्यांना हाताने हटवू शकत नाही आणि चप्पलेनंही मारूही शकत नाही."

बंगळुरूमध्ये आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये थरूर यांनी हे वक्तव्य केलं. थरूर यांनी आपले पुस्तक  'The Paradoxical Prime Minister' यावर बोलत होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शशी थरूर यांनी मोदीत्वामुळे म्हणजे मोदी आणि हिंदुत्व यामुळे ते पंतप्रधान मोदी म्हणून संघाहुन मोठे झाले.

थरूर यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. पहिले नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना आता पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची परवानगीची वाट पाहावी लागते. त्यामुळेच गृहमंत्र्यांनाच माहिती नाही सीबीआय संचालकांची बदली का झाली. परराष्ट्र मंत्र्यांना सरकारच्या परराष्ट्र धोरणाबद्दल माहिती नाही आणि संरक्षण मंत्र्यांना राफेल करारबद्दल माहिती नाही अशी टीकाही थरूर यांनी केली.

Loading...

थरूर यांच्या विधानानंतर  भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आक्षेप घेतला. "काँग्रेस नैराश्यग्रस्त झाली आहे. त्यामुळे ते पंतप्रधान मोदींनी खालच्या थराला येऊन टीका करत आहे. पण जनता सर्व पाहत आहे. ते पंतप्रधानांवर जितकी टीका करतील तितकी पंतप्रधानांची बाजू भक्कम होईल" असं प्रत्युत्तर प्रसाद यांनी दिले आहे.

काँग्रेस हिंदू देवी-दैवतांचा अपमान करत आहे. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. राहुल गांधी स्वत: शिवभक्त आहे. त्यांनी आपल्या नेत्यांना याबद्दल समजावून सांगितलं पाहिजे. थरूर यांच्या विधानामुळे राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि देशाची माफी मागावी अशी मागणीही प्रसाद यांनी केली.

===========================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2018 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...