मराठी बातम्या /बातम्या /देश /

'राज ठाकरे हिंदूजननायक की खलनायक? त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी', संजय निरुपम भडकले

'राज ठाकरे हिंदूजननायक की खलनायक? त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी', संजय निरुपम भडकले

"राज ठाकरे कायम भूमिका बदलतात. त्यांनी उत्तर भारतीय लोकांची माफी मागावी. जर ते केलं नाही तर राम काय, हनुमान सुद्धा त्यांना माफ करणार नाही", असा टोला संजय निरुपम यांनी लगावला.

"राज ठाकरे कायम भूमिका बदलतात. त्यांनी उत्तर भारतीय लोकांची माफी मागावी. जर ते केलं नाही तर राम काय, हनुमान सुद्धा त्यांना माफ करणार नाही", असा टोला संजय निरुपम यांनी लगावला.

"राज ठाकरे कायम भूमिका बदलतात. त्यांनी उत्तर भारतीय लोकांची माफी मागावी. जर ते केलं नाही तर राम काय, हनुमान सुद्धा त्यांना माफ करणार नाही", असा टोला संजय निरुपम यांनी लगावला.

मुंबई, 15 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते उद्या खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी हनुमान चालीसाचं सामूहिक पठण केलं जाणार आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पाठोपाठ काँग्रेसकडूनही टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी तर राज ठाकरे यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवर असलेल्या भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन ते हिंदूजननायक आहेत की खलनायक? असा सवाल निरुपम यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाबाबत मनसे कार्यकर्त्यांकडून एक बॅनर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. त्यात राज ठाकरे यांचा 'हिंदूजननायक' असा उल्लेख केला आहे. त्याच उल्लेखाचा धागा पकडत संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

"राज ठाकरे हे हिंदूजननायक की खलनायक हे महाराष्ट्रातील जनतेला कळेल. ते दंगल घडवून आणतील यातून कोणाचं नुकसान होईल? ते बघा", असं संजय निरुपम म्हणाले. "राज ठाकरे कायम भूमिका बदलतात. त्यांनी उत्तर भारतीय लोकांची माफी मागावी. जर ते केलं नाही तर राम काय, हनुमान सुद्धा त्यांना माफ करणार नाही", असा टोला त्यांनी लगावला.

(मनसेला राष्ट्रवादीचं 'पुरोगामी' उत्तर? हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन)

"महाराष्ट्रातील सरकार स्थिर आहे. पण लोकांना भडकवण्यासाठी रमजानमध्ये जाणीवपूर्वक त्रास देणारी ही मागणी आहे. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतोय, कुठल्याही मशिदीवरचे भोंगे काढले जाऊ नयेत. हवं तर आवाजाच्या मर्यादेबाबत मुस्लिम मौलाना यांच्यासोबत मुंबई पोलिसांनी चर्चा करावी", असा सल्ला संजय निरुपम यांनी दिला.

बाळासाहेब थोरातांकडूनही टीका

दरम्यान, "काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भूमिकेवर टीका केली. राज ठाकरे यांची भूमिका प्रत्येक दोन वर्षात बदलते", असा टोला त्यांनी लगावला. थोरात यांनी याच मुद्द्यावरुन भाजपवरही निशाणा साधला. "आमचा विचार समतेचा आहे. भाजपकडून सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. भाजप वातावरण खराब करतंय. सगळे लोक एकत्र सर्व सण साजरे करतात. पण त्याचं राजकारण केले जात आहे", असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

शरद पवारांकडून चिंता व्यक्त

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील राज ठाकरे यांच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली आहे. "मला स्वत:ला एखाद दुसरी व्यक्ती सोडली तर अशाप्रकारचं राजकारण करावं, असं म्हणणारं वातावरण दिसत नाहीय. ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत अशा राजकारण्यांनी एखादी टोकाची भूमिका घेऊन पुढे जात असेल तर त्याचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करावं, अशी भूमिका घेतली तर ते काळजी करण्यासारखं आहे. या सगळ्या कार्यक्रमामुळे समाजातील समाजिक ऐक्य संकटात येईल की काय याची चिंता माझ्या सारख्यांना सतावतेय. काही झालं तरी महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे. सर्व धर्म, जाती, भाषा यांच्यामध्ये सामजंस्य असलं पाहिजे. समाजाला पोषक भूमिका घ्यायची ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे", असं शरद पवार म्हणाले.

First published:

Tags: MNS, Raj Thackeray, Sanjay nirupam, काँग्रेस