शीखविरोधी दंगलप्रकरणी काँग्रेसचा नेता सज्जन कुमारला जन्मठेप

शीखविरोधी दंगलीप्रकरणी आता अखेर 34 वर्षांनंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात इतरही काही काँग्रेस नेत्यांवर आरोप आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2018 03:05 PM IST

शीखविरोधी दंगलप्रकरणी काँग्रेसचा नेता सज्जन कुमारला जन्मठेप

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : दिल्लीमध्ये 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगलप्रकऱणी काँग्रेसनेते सज्जन कुमार याला दोषी ठरवण्यात आलं आहे. कट रचणे आणि दंगल घडवून आणण्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात शीखविरोधी दंगल भडकली होती. दंगलीत 3 हजारपेक्षा अधिक शीख नागरिकांची हत्या करण्यात आली होती. काँग्रेस नेत्यांच्या चिथावणीमुळेच ही दंगल भडकली, असा आरोप आहे.


Loading...


शीखविरोधी दंगलीप्रकरणी आता अखेर 34 वर्षांनंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात इतरही काही काँग्रेस नेत्यांवर आरोप आहे. मध्य प्रदेशचे आगामी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावरही या प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत.या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय झालं?<strong>

-1984ला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या

-हत्येनंतर शीखविरोधी दंगल

-न्या. जी.टी.नानावटी आयोगाने सूचना केल्यानंतर गुन्हा दाखल

-सज्जन कुमार ब्रह्मानंद गुप्ता, खुशाल सिंग, वेद प्रकाश आणि आणखी एकाविरोधात गुन्हा

-हत्येचा आणि दंगल घडवण्याचा गुन्हा दाखल

-जानेवारी 2010 मध्ये सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

-कनिष्ठ न्यायालयाकडून सज्जन कुमार दोषमुक्त

-अनेक पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा हायकोर्टात दावा

-17 डिसेंबर 2018 - हायकोर्टाकडून सज्जन कुमार दोषी

-सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2018 11:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...