• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'कतरिनाच्या गालांसारखे रस्ते बनवा', भर सभेत काँग्रेस मंत्र्याचं वक्तव्य

'कतरिनाच्या गालांसारखे रस्ते बनवा', भर सभेत काँग्रेस मंत्र्याचं वक्तव्य

राज्यमंत्री राजेंद्र गुढा (Rajendra Gudhha) यांनी कतरिनाचा (Katrina Kaif) उल्लेख करत केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर (Social Media) चांगलंच व्हायरल (Viral) होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

 • Share this:
  जयपूर, 24 नोव्हेंबर : राजस्थानचे नवनियुक्त राज्यमंत्री राजेंद्र गुढा (Rajendra Gudha) त्यांच्या एका वक्तव्याने चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे. खरंतर राजेंद्र यांनी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात आले होते. त्यांच्या मतदारसंघात 'प्रशासन गावांच्यासोबत' या योजनेसंबंधित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी राजेंद्र गुढा यांनी आपल्या गावरान भाषेत अभियांत्रिकांना (Engineers) रस्त्यासंबंधित (Road) सूचना दिल्या. यावेळी त्यांनी रस्ते हे बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या (Katrina Kaif) गालांसारखे बनले पाहिजेत, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर कार्यक्रमात उपस्थित गावकऱ्यांमध्ये हशा पिकला.

  गावकऱ्यांची रस्ते बनवण्याची विनंती

  राजेंद्र गुढा यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधी देखील असे अनेक वक्तव्य केले आहेत. ते बसपा पक्षात होते. त्यांनी तिथून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांची दबंग आमदार म्हणून ख्याती आहे. त्यांच्या कामाची दखल खुद्द गहलोत सरकारला घ्यावी लागली. राजस्थानच्या मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला यावेळी राजेंद्र यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी (23 नोव्हेंबर) राजेंद्र त्यांच्या मतदारसंघात आले होते. पौंख गावात त्यांचं स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमात भाषण करताना रस्ते कसे असावेत याबाबत अभियांत्रिकांना आवाहन करताना त्यांनी कतरिनाचं नाव घेतलं. खरंतर गावकऱ्यांनी त्यांना रस्ते बनवण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी वक्तव्य केलं. हेही वाचा : राज्यातील चार महापालिकांमध्ये पोटनिवडणुकीचा धुराळा, 21 डिसेंबरला मतदान, वाचा संपूर्ण कार्यक्रम राज्यमंत्री राजेंद्र गुढा यांनी कतरिनाचा उल्लेख करत केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यावर चांगलीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, गुढा यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांना तातडीने गती देण्यात यावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. दुसरीकडे गुढा मंत्री बनल्यानंतर त्यांचं मतदारसंघात अनेक ठिकाणी स्वागत केलं जात आहे. हेही वाचा : 'एसटीचं विलिनीकरण केल्यास इतर महामंडळांचंही विलिनीकरणही करावं लागेल'

  राजेंद्र गुढा यांच्याविषयी थोडक्यात माहिती

  राजेंद्र गुढा याआधी देखील त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. ते राजस्थानच्या झंझुनूं जिल्ह्यातील उदयपूरवाटी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. सुरुवातीला त्यांनी बसपा पक्षातून निवडणूक लढवली होती. गेल्या निवडणुकीत बसपाचे सहा उमेदवार जिंकले होते. पण सगळ्यांनी नंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या सर्व आमदारांनी गहलोत सरकारवर संकट आलं तेव्हा महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात गुढा यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली.
  First published: