नवी दिल्ली, 03 जून: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी ट्विटर (Twitter) वरुन अनेकांना अनफॉलो केलं आहे. यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. यावरुन पक्षातल्या काही जणांनीही त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. भाजपनं हे असहिष्णुतेचं उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. यावेळी भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उदाहरण देत म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसह टीकाकारांनाही फॉलो करतात.
ट्विटरवर राहुल गांधी यांचं 18.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यापैकी राहुल गांधी यांनी अनेक पत्रकार आणि त्यांचे वैयक्तिक साथीदारांसह सुमारे 50 जणांना ट्विटरवरुन अनफॉलो केलं. ट्विटरवर राहुल गांधी 219 जणांना फॉलो करतात. मात्र त्यांनी आता अल्टन्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि बरखा दत्त, निखिल अल्वा आणि इतर काही जणांना अनफॉलो केलं.
हेही वाचा- चांगली बातमी: पुणेकरांनी कोरोना लढ्यातला पार केला 'हा' महत्त्वाचा टप्पा
गुरुवारी दुपारी 1.25 पर्यंत, राहुल गांधी यांची मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर असलेल्या प्रोफाईलवर 219 लोकांना फॉलो करत आहेत.
50 जणांना अनफॉलो करण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र त्यांच्या या कृतीमुळे काँग्रेसमध्ये चर्चेचा विषय बनलं असून याचा पाठपुरावा होऊ शकतो, अशी माहिती IANS नं दिली आहे.
हेही वाचा- विराट कोहली आणि रवी शास्त्रीच्या चर्चेचा Audio लीक! ऐका, काय बोलत आहेत दोघं
वायनाडचे खासदार असलेले राहुल गांधी ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. बऱ्याचदा ते मोदी सरकार टीका करत असतात. ट्विटरच्या माध्यमातून सध्या ते कोविड-19 आणि इतर मुद्द्यांवरुन ते मोदी सरकारवर निशाणा साधतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Rahul gandhi