VIDEO: विद्यार्थ्यांनी अनुभवलं राहुल गांधींचं फिटनेस प्रेम, 9 सेकंदामध्ये मारले 13 Pushups

VIDEO: विद्यार्थ्यांनी अनुभवलं राहुल गांधींचं फिटनेस प्रेम, 9 सेकंदामध्ये मारले 13 Pushups

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी कन्याकुमारीच्या एका शाळेला भेट दिली. यावेळी राहुल यांचं फिटनेस प्रेम विद्यार्थ्यांनी अनुभवलं.

  • Share this:

कन्याकुमारी (तामिळनाडू), 1 मार्च : तामिळनाडू विधनसभा निवडणुकीच्या प्रचाराला (Tamil Nadu Assembly Elections) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांचा राहुल दौरा करत आहेत. सोमवारी त्यांनी कन्याकुमारीच्या एका शाळेला भेट दिली. यावेळी राहुल यांचं फिटनेस प्रेम विद्यार्थ्यांनी अनुभवलं.

राहुल यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांशी सुरुवातीला संवाद साधला. त्यानंतर त्यांनी एका विद्यार्थासोबत आयकिडो (Aikido)  केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आग्रह केल्यानंतर राहुल यांनी एका विद्यार्थिनीसोबत स्टेजवर पुशअप्स (Rahul Gandhi Pushups) देखील मारले.

कन्याकुमारीच्या सेंट जोसेफ शाळेतल्या मोरलिन शेनिघा या विद्यार्थीनीने राहुल यांना पुशअप चॅलेंज दिलं होतं. शेनिघा 10 वी ची विद्यार्थीनी असून ती ज्युडो कराटे शिकत आहे. राहुल यांनी यावेळी 9 सेकंदात 13 पुशअप्स मारले.

#WATCH: Congress leader Rahul Gandhi doing push-ups and 'Aikido' with students of St. Joseph's Matriculation Hr. Sec. School in Mulagumoodubn, Tamil Nadu pic.twitter.com/qbc8OzI1HE

— ANI (@ANI) March 1, 2021

राहुल गांधी यापूर्वी पुदुच्चेरीमध्ये मासेमारांसोबत समुद्रात गेले होते. त्यावेळी त्यांनी समुद्रात उडी मारुन पोहण्याचा आनंद लुटला होता. त्यानंतर राहुल यांचा समुद्रात भिजलेला एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोत राहुल गांधी यांचे सिक्स पॅक अ‍ॅब्सची सर्वांनी प्रशंसा केली होती.

#WATCH| Kerala: Congress leader Rahul Gandhi took a dip in the sea with fishermen in Kollam (24.02.2021)

(Source: Congress office) pic.twitter.com/OovjQ4MSSM

— ANI (@ANI) February 25, 2021

राहुल गांधी सध्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. यापैकी केरळ आणि पुदुच्चेरीचा दौरा त्यांनी पूर्ण केला आहे.

Published by: News18 Desk
First published: March 1, 2021, 6:09 PM IST

ताज्या बातम्या