Rape In India वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार, शेअर केला मोदींचा VIDEO

Rape In India वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार, शेअर केला मोदींचा VIDEO

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या Rape In India वक्तव्यावर लोकसभेत गदारोळ झाल्यानंतर भाजपच्या खासदारांनी राहुल यांनी भारतीय महिलांची माफी मागावी असे मागणी केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या Rape In India वक्तव्यावर लोकसभेत गदारोळ झाल्यानंतर भाजपच्या खासदारांनी राहुल यांनी भारतीय महिलांची माफी मागावी असे मागणी केली होती. मात्र राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना, "मोदी आणि शाह अर्थव्यवस्थेच्या दुरावस्थेबाबत बोलणे टाळण्यासाठी हा मुद्दा उचलून धरत आहेत. मी माफी मागणार नाही. माफी मोदींनी देशाची मागावी. त्यांच्यामुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे”, असे सांगत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा 2014चा एक व्हिडीओ ट्वीट केला.

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या या 2014च्या व्हिडीओमध्ये मोदींनी 'दिल्लीला ही बलात्काराची राजधानी आहे' असे संबोधले होते. त्यामुळं राहुल गांधी यांनी माफी न मागण्याचा निर्णय घेताच, मोदींवर पलटवार केला आहे. दरम्यान या प्रकरणावरून चाललेल्या गदारोळामुळे राज्यसभा आणि लोकसभा अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

लोकसभेत गदारोळ

राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये प्रचारादरम्यान एका सभेत ‘मेक इन इंडियाचे रेप इन इंडिया झाले आहे’, असे धक्कादायक वक्तव्य केले. या वक्तव्यावर लोकसभेत आज गदारोळ माजला. भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांनी सर्व महिलांची माफी मागावी अशी मागणी केली. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी शिक्षा झाली पाहिजे, असे लोकसभा अध्यक्षांना सांगितले. राहुल गांधी यांच्या ‘मेक इन इंडिया’ नाही तर आता ‘रेप इन इंडिया’ झाला आहे या धक्कादायक वक्तवयावर यावर केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर टीका करण्यास सुरुवात केली. भाजप खासदारांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी अध्यक्षांकडे केली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या गोंधळानंतर डीएमकेच्या खासदार कनीमोळी यांनी राहुल गांधींची बाजू घेत, “त्यांना काय म्हणायचे आहे ते समजून घ्या”, असे सांगितले. मात्र त्यावर स्मृती इराणी आणखी संतापल्या. अखेर अध्यक्षांना 12 वाजेपर्यंत लोकसभा आणि राज्यसभा तहकूब करावी लागली.

काय म्हणाले राहुल गांधी

गुरुवारी राहुल गांधींनी झारखंडमधील मेहराणा मेळाव्यात मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. या सभेत राहुल गांधी यांनी, "नरेंद्र मोदी म्हणाले होते मेक इन इंडिया, आता तुम्ही जिथे जिथे बघाल तिथे मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया झाला आहे. जर तुम्ही वृत्तपत्रे पाहिलीत तर तुम्हाला कळेल की उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आमदारानं एक मुलीवर बलात्कार केला, त्यांनंतर तिचा अपघात घडवून आणला, यावर एका शब्दानं मोदी काही म्हणाले नाहीत. भारतात फक्त बलाक्तार होत आहेत”, या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2019 01:22 PM IST

ताज्या बातम्या