देशाला 'स्मार्ट' उपायांची गरज, राहुल गांधींचा कोरोनावर नरेंद्र मोदींना सल्ला

देशाला 'स्मार्ट' उपायांची गरज, राहुल गांधींचा कोरोनावर नरेंद्र मोदींना सल्ला

'कोव्हिडच्या आधी देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. आता कोरोनाच्या निमित्ताने सरकार आपलं अपयश लपविण्याचा प्रयत्न करत आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 13 एप्रिल : कोरोनाचा विळखा देशात वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी  तीव्र चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही सल्लेही दिले आहेत. पंतप्रधानांनी देशातल्या गरीब लोकांसाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. लॉकडाऊन हे गरीबांसाठी मोठं संकट ठरलं आहे. शेतकरी आपला माल विकू शकत नाही. मजुरांचे हाल होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर देशाला स्मार्ट उपायांची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या आधी काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली आहे. कोव्हिडच्या आधी देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. आता कोरोनाच्या  निमित्ताने सरकार आपलं अपयश लपविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही काँग्रेसने केली होती. तर राहुल गांधीही सातत्याने सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत.

सरकार कोरोनाचं गांभीर्य उशीरा कळालं. आधीच उपाययोजना सुरू केल्या असत्या तर ही परिस्थिती ओढवली नसती असंही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. या काळात सरकारने तातडीने कुठली पावलं उचलावीत याच्या सूचनाही काँग्रेसने सरकारला केल्या आहेत.

सावध राहा! सरकार म्हणतं, कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती आलेली नाही

या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांशी फोनवर चर्चा केली होती. त्याचबरोबर सर्वपक्षीय नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे चर्चाही केली होती.

Lockdown असतानाही जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

देशभर कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. गेल्या 24 तासांमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला. ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. तर कोरोना रुग्णांची सख्या 9352 वर पोहोचली आहे तर मृत्यूची संख्या 324 वर गेली आहे. 8048 रुग्ण उपचार घेत असून 979 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यात 72 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. मात्र देशात कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती अजूनही आलेली नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

आत्तापर्यंत 2,06,212 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यात 857 नवे रुग्ण सापडले. मात्र अशाही परिस्थितीत काही सकारात्मक घटना घडत आहेत. देशातल्या 25 राज्यांमधल्या काही जिल्ह्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळालं असून त्यात महाराष्ट्रातल्या गोंदिया या जिल्ह्याचा समावेश आहे.

First published: April 13, 2020, 11:18 PM IST

ताज्या बातम्या